रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची युक्रेन आघाडीवरील खेर्सन व लुहान्स्कला भेट

- पॅसिफिकमधील युद्धसरावात रशियाकडून ‘न्यूक्लिअर बॉम्बर्स’चा समावेश

मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेन आघाडीवरील खेर्सन व लुहान्स्क प्रांताला भेट दिली. यावेळी त्यांनी दोन्ही प्रांतातील लष्करी अधिकाऱ्यांशी संवाद साधून युक्रेनविरोधातील संघर्षाची स्थिती जाणून घेतली. गेल्या वर्षी रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी या दोन्ही भागांना भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. युक्रेनकडून रशियाविरोधातील प्रतिहल्ल्यांच्या मोहिमेची तयारी सुरू असतानाच पुतिन यांनी युद्ध आघाडीवरील क्षेत्रांना भेट देणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची युक्रेन आघाडीवरील खेर्सन व लुहान्स्कला भेट - पॅसिफिकमधील युद्धसरावात रशियाकडून ‘न्यूक्लिअर बॉम्बर्स’चा समावेशसोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी खेर्सन प्रांतातील ‘डिनायपर बॅटलग्रुप’च्या कमांड सेंटरला भेट दिली. यावेळी पुतिन यांनी वरिष्ठ लष्करी अधिकारी जनरल ओलेग माकारेविच व जनरल मिखाईल टेपलिन्स्की यांच्याशी चर्चा केली. जनरल ओलेग माकारेविच हे ‘डिनायपर बॅटलग्रुप’चे प्रमुख असून जनरल टेपलिन्स्की यांच्याकडे रशियाच्या ‘एअरबोर्न ट्रुप्स’ची जबाबदारी आहे. लष्करी अधिकाऱ्यांबरोबरील बैठकीत पुतिन यांनी खेर्सन आघाडीवरील युद्धस्थितीची माहिती घेतली.

त्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी लुहान्स्क पीपल्स रिपब्लिक या प्रांताला भेट दिली. या प्रांतात तैनात असलेल्या ‘वोस्टोक नॅशनल गार्ड’च्या कमांड सेंटरमध्ये जाऊन रशियन राष्ट्राध्यक्षांनी लष्करी अधिकारी व जवानांना ‘ईस्टर’ सणाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील संघर्षासाठी सज्ज राहण्याचे निर्देशही दिले. गेल्या वर्षी रशियाने युक्रेनच्या डोनेत्स्क, लुहान्स्क, खेर्सन व झॅपोरिझिआ या प्रांतांना रशियन संघराज्यात सामील केल्याची घोषणा केली होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची युक्रेन आघाडीवरील खेर्सन व लुहान्स्कला भेट - पॅसिफिकमधील युद्धसरावात रशियाकडून ‘न्यूक्लिअर बॉम्बर्स’चा समावेशत्यानंतर या प्रांतांमधील भागांना भेट देण्याची रशियन राष्ट्राध्यक्षांची ही दुसरी वेळ आहे. मार्च महिन्यात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी डोनेत्स्क प्रांतातील मारिपोल शहरालाही भेट दिली होती.

रशियाने ताब्यात घेतलेला भाग पुन्हा परत मिळविण्यासाठी युक्रेनने प्रतिहल्ल्यांची योजना आखली आहे. ‘पेंटॅगॉन लीक’मध्ये गहाळ झालेल्या कागदपत्रांनुसार, एप्रिल महिन्याच्या अखेरीस युक्रेनी लष्कर रशियावर प्रतिहल्ले चढविणार आहे. मात्र बाखमतमधील संघर्ष, युक्रेनकडील सध्याची क्षमता व रशियाने वाढविलेले हल्ल्यांची तीव्रता पाहता युक्रेनची नवी मोहीम कितपत यशस्वी होईल, याबाबत पाश्चिमात्य वर्तुळात साशंकता आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची युक्रेन आघाडीवरील खेर्सन व लुहान्स्कला भेट - पॅसिफिकमधील युद्धसरावात रशियाकडून ‘न्यूक्लिअर बॉम्बर्स’चा समावेशअशा पार्श्वभूमीवर रशियन राष्ट्राध्यक्षांनी युक्रेन आघाडीवरील भागांना भेट देणे महत्त्वाचे ठरते.

दरम्यान, रशियाने पॅसिफिक क्षेत्रासह पूर्व रशियात नव्या युद्धसरावाला सुरुवात केल्याचे समोर आले आहे. पॅसिफिक क्षेत्रातील युद्धसरावाबाबत राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगु यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त रशियन माध्यमांनी दिले आहे. या युद्धसरावात रशियाने ‘न्यूक्लिअर बॉम्बर्स’चाही समावेश केला आहे. रशियाच्या ‘टीयु-95’ या बॉम्बर्सनी पॅसिफिकमधील ‘बेरिंग सी’ तसेच ‘ओखोत्स्क सी’ क्षेत्रात गस्त घातल्याची माहिती रशियाच्या संरक्षणन विभागाने दिली. त्याचवेळी पूर्व रशियात सुरू असलेल्या सरावात युद्धनौका, पाणबुड्या तसेच रशियन लष्कराच्या तुकड्या सहभागी झाल्याचे वृत्त रशियन माध्यमांनी दिले आहे.

हिंदी English

 

leave a reply