रशिया चीनचा सर्वात मोठा इंधन निर्यातदार देश

मॉस्को – 2022 साली चीनने सौदी अरेबियाकडून 8 कोटी 74 लाख टन कच्च्या तेलाची खरेदी केली होती. यामुळे सौदी हा चीनचा सर्वात मोठा इंधन निर्यातदार देश होता. पण गेल्या वर्षभरात जागतिक समीकरणे बदलली असून रशियाने सौदीची जागा घेतली आहे. 2023 सालच्या पहिल्या दोन महिन्यातच रशिया हा चीनचा सर्वात मोठा इंधन निर्यातदार देश बनला आहे. चीनच्या सरकारी यंत्रणांनी ही माहिती दिली.

रशिया चीनचा सर्वात मोठा इंधन निर्यातदार देश2022 सालच्या पहिल्या दोन महिन्यात चीनने सौदीकडून 1 कोटी 39 लाख टन इंधनाची खरेदी केली होती. पण युक्रेनच्या युद्धानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाने टाकलेल्या निर्बंधानंतर रशियाने सवलतीच्या दरात इंधनाची विक्री सुरू केली. इंधनाचे सर्वात मोठे ग्राहक असलेल्या चीन व भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात इंधनाची खरेदी केल्याचा दावा केला जातो. चीनने या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यातच 1 कोटी 57 लाख टन इंधनाची खरेदी केली. या वर्षी देखील चीनकडून रशियन इंधनाची याच वेगाने आयात सुरू राहील, असा दावा केला जातो.

हिंदी

 

leave a reply