पाश्चिमात्यांच्या निर्बंधांनंतर इंधननिर्यात सुरळीत राखण्यात रशिया यशस्वी

- ऊर्जामंत्री निकोलाय शुल्गिनोव्ह

मॉस्को – रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियावर दडपण आणण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले होते. यात रशियन अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या इंधनक्षेत्राचाही समावेश होता. इंधनक्षेत्रावरील निर्बंधांनंतर रशियन अर्थव्यवस्था कोसळेल व रशियाची वाताहत होईल, अशी भाकिते पाश्चिमात्य नेते व अधिकाऱ्यांनी केली होती. मात्र प्रत्यक्षात रशियाने निर्बंध झुगारण्यात यश मिळविले असून इंधन निर्यात सुरळीत ठेवली आहे, अशी माहिती देशाचे ऊर्जामंत्री निकोलाय शुल्गिनोव्ह यांनी दिली.

पाश्चिमात्यांच्या निर्बंधांनंतर इंधननिर्यात सुरळीत राखण्यात रशिया यशस्वी - ऊर्जामंत्री निकोलाय शुल्गिनोव्ह‘पाश्चिमात्यांच्या निर्बंधांमुळे बाधित झालेले इंधन मित्रदेशांना निर्यात करण्यात आले आहे. रशियाच्या इंधनविक्रीत घसरण झालेली नाही’, असे ऊर्जामंत्री निकोलाय शुल्गिनोव्ह यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच ‘ब्लूमबर्ग’ या आघाडीच्या वेबसाईटनेही रशियाच्या इंधननिर्यातीवर फरक पडला नसल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, रशिया प्रतिदिनी 30 लाख बॅरल्स कच्चे तेल निर्यात करीत आहे. रशियाच्या या निर्यातीत चीन व भारत या देशांचा मोठा वाटा असल्याचे समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी, रशियन इंधनाच्या व्यापारात सहभागी असलेल्या कंपन्यांना अमेरिकी यंत्रणांकडून प्रोत्साहन दिले जात असल्याचा दावा ब्रिटनमधील आघाडीच्या दैनिकाने केला होता. फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेसह ‘जी7’ व युरोपिय महासंघाने रशियन इंधनाच्या दरांवर मर्यादा निश्चित करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली होती. रशियाचे कच्चे तेल प्रति बॅरल 60 डॉलर्स व त्याखालील किमतीत विकण्याची परवानगी देण्यात आली होती. पाश्चिमात्यांच्या निर्बंधांनंतर इंधननिर्यात सुरळीत राखण्यात रशिया यशस्वी - ऊर्जामंत्री निकोलाय शुल्गिनोव्हअसे न करणाऱ्या देशांवर तसेच संबंधित व्यवहारात सहभागी असणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचा सज्जड इशारा देण्यात आला होता.

मात्र या अंमलबजावणीनंतरही रशियन इंधनाच्या व्यापारात फार मोठा फरक पडल्याचे समोर आलेले नाही. त्यामुळे यासाठी पुढाकार घेणाऱ्या अमेरिकेनेच रशियन इंधनाच्या व्यापारात सहभागी असणाऱ्या कंपन्यांना व्यापार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे.

रशिया हा इंधन बाजारपेठेतील आघाडीचा देश असून प्रतिदिनी या देशाकडून सुमारे एक कोटी बॅरल्सचे उत्पादन करण्यात येते. युक्रेनमधील संघर्षानंतर यात काही प्रमाणात घट झाली असली तरी इंधनातून मिळणाऱ्या उत्पन्नात फारसा फरक पडला नसल्याचे विविध अहवालांवरून समोर आले होते. रशियन ऊर्जामंत्र्यांच्या वक्तव्याने याला दुजोरा मिळाल्याचे दिसत आहे.

हिंदी

 

leave a reply