रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला असलेला धोका वाढला

-वित्तसंस्थेचा इशारा

वॉशिंग्टन – रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळीत पुन्हा अडथळे निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला असणारा धोकाही वाढला आहे, असा इशारा ‘मुडीज् ऍनालिटिक्स’ या आंतरराष्ट्रीय वित्तीय सल्लागार संस्थेने दिला आहे. गेल्या आठवड्यात रशियाने युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यानंतर जागतिक शेअरबाजारांमध्ये मोठी पडझड झाली असून इंधनासह अन्नधान्य व धातूंच्या दरांमध्ये विक्रमी वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर नवा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

जागतिक अर्थव्यवस्थेलागेल्या गुरुवारी रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला होता. या हल्ल्यावरून रशियाला धडा शिकविण्यासाठी पाश्‍चिमात्य देशांनी रशियावर मोठ्या प्रमाणात कठोर निर्बंध लादले आहेत. रशिया हा इंधन, अन्नधान्य तसेच खनिज क्षेत्रातील आघाडीच्या उत्पादक देशांपैकी एक आहे. त्यामुळे या देशावर टाकलेल्या निर्बंधांचे परिणाम आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत दिसण्यास सुरुवात झाली आहे.

कच्च्या तेलासह नैसर्गिक इंधनवायुचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. गहू, मका यासारख्या धान्यांच्या किंमतीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. सोने, निकेल, ऍल्युमिनिअम, पॅलाडियम यासारख्या धातूंचे दरही कडाडण्यास सुरुवात झाली आहे. याचे परिणाम उद्योगक्षेत्रावर दिसून येत आहेत. गाड्यांचे उत्पादन कमी होण्याचे संकेत मिळत असून कोरोना साथीत उद्भवलेल्या संकटाप्रमाणे सेमीकंडक्टर्सची टंचाई निर्माण होण्याचे भाकित वर्तविण्यात आले आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेलायाच पार्श्‍वभूमीवर ‘मुडीज् ऍनालिटिक्स’ने दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो. या संस्थेने आपल्या इशार्‍यात कोरोनाच्या साथीप्रमाणे जागतिक पुरवठा साखळी पुन्हा एकदा कोलमडून पडेल, असे बजावले आहे. याचे परिणाम आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर होऊन कच्च्या मालाची तसेच उत्पादनांची टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होईल, असे ‘मुडीज् ऍनालिटिक्स’ने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील विश्‍लेषकांनी रशिया-युक्रेन युद्धामुळे आर्थिक मंदी येऊ शकते, असे बजावले होता.

leave a reply