सॅमसंग चीनमधील मोबाईल डिस्प्ले कारखाना भारतात हलविणार

- 4500 कोटी रुपयांची गुंतवणूक

नवी दिल्ली – जगातील अग्रगण्य मोबाईल उत्पादक कंपनी सॅमसंग चीनमधून आपले मोबाईल डिस्प्लेचे उत्पादन घेणारा कारखाना हलवून भारतात आणणार आहे. उत्तरप्रदेशात यासाठी 4 हजार 800 कोटी रुपयांची गुंतवणूक सॅमसंग करणार असून चीनसाठी हा आणखी एक झटका आहे.

कोरोनाच्या आपत्तीमुळे जगभराचा रोष चीनवर असून चीनबरोबरील व्यापारी संबंध यामुळे ताणले गेले आहेत. कित्येक बहुराष्ट्रीय कंपन्या आपले कारखाने चीनबाहेर हलवत आहेत. या संधीचा लाभ उचलण्यासाठी भारताने गुंतवणूक नियम सुलभ केले आहेत. तसेच भारताला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपययोजना करण्यात येत आहे. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताचे धोरण पाहता व भारतीय बाजारपेठेचा विचार करता बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतात गुंतवणूक सुरू केली आहे.

दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगचे उत्पादन कारखाने याआधीच भारतात आहेत. आता आणखी एक कारखाना सॅमसंग चीनमधून भारतात हलवत आहे. डिस्प्लेचे उत्पादन घेणारा चीनमधील हा कारखाना हलवून सॅमसंग उत्तरप्रदेशमध्ये स्थापन करणार आहे. यासाठी कंपनीला अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून अडीचशे कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटीही माफ केली जाणार आहे. याशिवाय 460 कोटी रुपयांचे आर्थिक प्रोत्साहनही कंपनीला दिले जाणार असल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारतर्फे देण्यात आली. गेल्या काही महिन्यात कित्येक कंपन्यांनी आपली युनिट चीनमधून भारतात हलविली आहेत. आयफोनचे उत्पादन घेणारे व त्याचे भाग तयार करणाऱ्या 9 कंपन्यांनी भारतात कारखाने उघडले होते. या पार्श्‍वभूमीवर हे वृत्त महत्त्वाचे ठरते.

leave a reply