आर्मेनिया-अझरबैजान संघर्षात सात जण ठार

इराणमधील जनतेकडून अझरबैजानवर हल्ल्याची मागणी

iran armenia security chiefबाकू/तेहरान – ‘नागोर्नो-काराबाख’च्या मुद्यावरुन आर्मेनिया आणि अझरबैजानच्या सीमेवर पेटलेल्या सात जवानांचा बळी गेला. या मध्य आशियाई देशांनी नव्याने संघर्षबंदी प्रस्थापित करावी, असे आवाहन युरोपिय देश करीत आहेत. तर इराणमधील जनता अझरबैजानवर हल्ल्याची मागणी करीत असल्याची माहिती समोर येत आहे. इस्रायलशी सहकार्य असलेल्या अझरबैजानला आपल्या देशात विलिन करावे, असे इराणमधील जनतेचे म्हणणे आहे. या दरम्यान, इराण आणि आर्मेनियाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये बैठक पार पडली आहे.

ARMENIA-AZERBAIJANसोव्हिएत रशियातून बाहेर पडल्यानंतर, १९९१ सालापासून आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात सीमावादावरुन पेटलेल्या संघर्षात ३० हजार जणांचा बळी गेला आहे. अझरबैजानमधील ‘नागोर्नो-काराबाख’ या आर्मेनियन बहुसंख्य असलेल्या भागावरील अधिकारावरुन या दोन्ही माजी सोव्हिएत देशांमध्ये दोन युद्धे पेटली होती. रशियाने वेळोवेळी मध्यस्थी करून आर्मेनिया-अझरबैजानमध्ये संघर्षबंदी घडविली होती. २०२० सालच्या संघर्षानंतरही रशियाने या दोन्ही देशांमध्ये संघर्षबंदी घडविण्यात यश मिळवले होते.

पण गेल्या वर्षी रशिया-युक्रेनचे युद्ध भडकल्यानंतर आर्मेनिया-अझरबैजानच्या सीमेवरील तणावही वाढत चालला आहे. पुन्हा एकदा नागोर्नो-काराबाखवरील दाव्यावरुन मध्य आशियाई देशांच्या सीमेवर चकमक सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांवर संघर्षबंदीच्या उल्लंघनाचे खापर फोडत आहेत. अशा परिस्थितीत मंगळवारी सीमेवरील ‘दाईग’ भागात दोन्ही देशांच्या लष्करात जोरदार चकमक उडाली. यामध्ये आर्मेनियाचे चार ते अझरबैजानचे तीन जवान मारले गेले. सीमेवरील या गोळीबारासाठी दोन्ही देश एकमेकांवर आरोप करीत आहेत.

ARMENIA-AZERBAIJAN borderनागोर्नो-काराबाख प्रकरणी आर्मेनिया व अझरबैजानमध्ये हा संघर्ष भडकलेला असताना शेजारच्या इराणमध्ये नव्या घडामोडी आकार घेत आहेत. आर्मेनियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अरमेन ग्रिगोरियन यांनी इराणची राजधानी तेहरानमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली शामखानी यांची भेट घेतली. कॉकेशस भागातील यथास्थिती बदलण्याच्या कुठल्याही प्रयत्नांना इराणचा कडाडून विरोध असेल. यामुळे या क्षेत्रातील तणाव वाढू शकतो, असे शामखानी यांनी स्पष्ट केले. आर्मेनियाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनीही इराणकडून सहकार्याची अपेक्षा केली.

तर इराणमधील जनता देखील अझरबैजानवरील हल्ल्याची मागणी करीत असल्याची बातमी समोर आली आहे. अझरबैजानला स्वतंत्र अस्तित्व नसून त्यांनी इराणमध्ये विलिन व्हावे, अशी मागणी उत्तर इराणमधील जनता करीत आहे. इराणमध्ये अझेरी वंशाचे नागरिक मोठ्या प्रमाणात असून अझरबैजानने आपल्या मूळ देशाशी पुन्हा जोडून घ्यावे, असे इराणी नागरिकांचे म्हणणे आहे. तर इस्रायलशी सहकार्य करणाऱ्या अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इलहान अलीयेव्ह यांची सत्ता उलथून इराणने या देशाचा ताबा घ्यावा, अशी आक्रमक मागणीही इराणमधून होत आहे. तसेच अझरबैजान इराणमध्ये विलिन झालाच तर ‘झंगेझूर कॉरिडॉर’ मोकळा होईल आणि इराण-रशियातील व्यापार अधिक सुरळीत होईल, असे काही इराणी विश्लेषक सुचवित आहेत.

दरम्यान, याआधी इराणने नागोर्नो-काराबाख प्रकरणापासून स्वत:ल दूर ठेवले होते. पण २०२० साली दोन्ही मध्य आशियाई देशांमध्ये पेटलेल्या संघर्षात इस्रायल, पाकिस्तान आणि तुर्कीने अझरबैजानला लष्करी सहाय्य पुरविल्यानंतर इराणने देखील आर्मेनियाबरोबरील लष्करी सहकार्य वाढविले आहे.

leave a reply