अमेरिकेच्या नॅशविल शाळेतील गोळीबारात सहा जणांचा बळी

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या नॅशविल शहरातील ‘ख्रिश्चन एलिमेीं स्कूल’मध्ये माजी विद्यार्थिनीने केलेल्या गोळीबारात सहा जणांचा बळी गेला. यामध्ये तीन मुलं आणि तीन कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची हृदयद्रावक माहिती समोर आली आहे. स्थानिक सुरक्षा यंत्रणेने हल्लेखोर विद्यार्थीनीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या वर्षात अमेरिकन शाळेतील गोळीबाराची ही 90वी घटना ठरते.

अमेरिकेच्या नॅशविल शाळेतील गोळीबारात सहा जणांचा बळीअमेरिकेच्या टेनिसी प्रांतातील नॅशविल येथील शाळेत सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालकही उपस्थित होते. याचा फायदा घेऊन ऑड्री हॅले या माजी विद्यार्थिनीने बेछुट गोळीबार केला. यामध्ये नऊ वर्षांखालील तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी बळी गेला. तर 60 वर्षांवरील तीन वृद्ध या हल्ल्यात ठार झाले. या घटनेवर अमेरिकेतून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर ‘मास शूटिंग’चे प्रकार रोखण्यासाठी कठोर कायदे आणण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी अमेरिकेत ‘मास शूटिंग’च्या सुमारे 650 घटनांमध्ये 673 जणांचा बळी गेला. या घटनांमागे अमेरिकेतील राजकीय ध्रुवीकरण, घसरलेली आर्थिक स्थिती, पोलीस दलांचे घटते मनुष्यबळ, अमली पदार्थांचा वापर, कमकुवत कायदे व मानसिक आजारांचे वाढते प्रमाण कारणीभूत असल्याचा दावा केला जातो.

हिंदी

 

leave a reply