लष्करी तळावरील तैनातीच्या खर्चावर दक्षिण कोरिया व अमेरिकेची सहमती

दक्षिण कोरियासेऊल/वॉशिंग्टन – दक्षिण कोरियात तैनात असलेल्या अमेरिकी लष्कराच्या खर्चाच्या मुद्यावर दोन देशांमध्ये एकमत झाले आहे. दक्षिण कोरियाने अमेरिकेला १३.९ टक्के अधिक रक्कम देण्याचे मान्य केले आहे. सुमारे दोन दशकानंतर प्रथमच दक्षिण कोरियाने अमेरिकी लष्कराच्या खर्चात एवढी मोठी वाढ करण्यास मान्यता दिली आहे. सध्या अमेरिकेचे २८,५०० जवान दक्षिण कोरियात तैनात आहेत.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, दक्षिण कोरिया अतिशय कमी पैशात अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याचा फायदा उचलत असल्याचा आरोप केला होता. ट्रम्प यांनी २०१९ साली दक्षिण कोरियाने अमेरिकी तळ व जवानांच्या खर्चासाठी पाच अब्ज डॉलर्स द्यावेत अशी मागणी केली होती. दक्षिण कोरियातून या मागणीवर तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. या मुद्यावरून दोन देशांमधील संबंध काही प्रमाणात दुरावल्याचेही संकेत मिळाले होते.

दक्षिण कोरियामात्र तरीही दोन देशांमध्ये या मुद्यावर गेले वर्षभर चर्चा सुरू होती. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी गेल्याच आठवड्यात दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए-इन यांच्याबरोबर व्हर्च्युअल कॉन्फरन्सच्या दक्षिण कोरियामाध्यमातून चर्चाही केली होती. या चर्चेत खर्चाच्या मुद्यासह उत्तर कोरियासंदर्भात बोलणी झाली होती. त्यानंतर दोन देशांमध्ये खर्चाबाबत झालेले एकमत लक्ष वेधून घेणारी गोष्ट ठरते.

नव्या तरतुदीनुसार, दक्षिण कोरिया अमेरिकेला १.०३ अब्ज डॉलर्स इतका निधी देणार आहे. हा निधी २०२१ सालासाठीची तरतूद असून त्यानंतर २०२२ ते २०२५ सालापर्यंत वेगळी व्यवस्था असणार आहे. दक्षिण कोरियाच्या संरक्षणखर्चाच्या अनुषंगाने अमेरिकेला देण्यात येणारी रक्कम वाढेल, असे सांगण्यात आले आहे. मंगळवारी झालेल्या एकमतानुसार २०२२ साली यावर्षीच्या तुलनेत ५.४ टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे.

‘मंगळवारी झालेल्या एकमतामुळे दोन देशांमधील संबंधात असणारी मोठी पोकळी भरून निघाली आहे. अमेरिकी फौजांची दक्षिण कोरियातील तैनाती व दोन देशांमधील संरक्षण आघाडी मजबूत करण्यावर शिक्कामोर्तबही झाले आहे’, या शब्दात दक्षिण कोरियाचे वरिष्ठ अधिकारी जेआँग युन-बो यांनी अमेरिकेबरोबरील तणाव निवळल्याचे संकेत दिले आहे.

leave a reply