अफगाणिस्तानची राजधानी काबुल वेगळे पाडण्याची तालिबानची योजना

- अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिली

वॉशिंग्टन/येकाटेरिनबर्ग – ‘तालिबानने अफगाणिस्तानच्या 34 प्रांतांपैकी 17 प्रांतांच्या राजधान्यांना घेराव टाकून अफगाणी सरकार आणि जनतेची कोंडी केली आहे. राजधानी काबुलबाबतही तालिबान अशीच कारवाई करणार आहे व ही तालिबानच्या डावपेचांना मिळालेली आघाडी ठरते’, असा इशारा अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिली यांनी दिला. त्याचबरोबर तालिबान अफगाणिस्तानचा पूर्ण ताबा घेऊ शकतो, अशी शक्यताही जनरल मिली यांनी व्यक्त केली. दरम्यान, अफगाणिस्तानातील तालिबानला मिळत असलेले यश लक्षात घेऊन ताजिकिस्तानने अफगाण सीमेजवळ युद्धसराव सुरू केला आहे.

अफगाणिस्तानची राजधानी काबुल वेगळे पाडण्याची तालिबानची योजना - अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिलीअफगाणिस्तानच्या 85 टक्के भूभागावर ताबा मिळविल्याचा तालिबानने दावा केला. अमेरिकेच्या वेगवान सैन्यमाघारीमुळे तालिबानला हे यश मिळाले असून लवकरच ही दहशतवादी संघटना पूर्ण अफगाणिस्तानचा ताबा घेईल, अशी चिंता व्यक्त केली जाते. पण गेल्या वर्षी दोहा येथे अमेरिकेबरोबर झालेल्या समझौत्यानुसार, तालिबानचे दहशतवादी राजधानी काबुलसह अफगाणिस्तानातील प्रांतीय राजधान्यांवर ताबा घेणार नसल्याचे ठरले होते. त्यामुळे काबुल व इतर प्रमुख शहरे अफगाणी सरकारच्या नियंत्रणाखाली राहतील, असा दावा केला जातो.

अफगाणिस्तानची राजधानी काबुल वेगळे पाडण्याची तालिबानची योजना - अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिलीअसे झाले तरी तालिबानच्या डावपेचांना मिळालेले हे यश असेल, असे अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिली यांनी बुधवारी माध्यमांसमोर सांगितले. अफगाणिस्तानातील जिल्ह्यांचा ताबा घेऊन तालिबान प्रांतांच्या राजधानींमधील जनतेची मोठी कोंडी करीत असल्याचे जनरल मिली यांनी लक्षात आणून दिले. ‘गेल्या आठवड्यात कतारमध्ये पार पडलेल्या बैठकीतही या आघाडीच्या जोरावर तालिबानने अफगाण सरकारला झुकविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यापुढे अफगाणिस्तानचे नेतृत्व आणि त्यांच्या जनतेच्या इच्छाशक्तीची कसोटी लागणार आहे’, असा इशारा अमेरिकेच्या संरक्षणदलप्रमुखांनी दिला.

दरम्यान, अमेरिकेचे लष्करी अधिकारी तसेच माजी नेते अफगाणिस्तान लवकरच तालिबानच्या हाती जाईल, असे सातत्याने संकेत देत आहेत. यामुळे तालिबानच्या उत्तरेकडील उझबेकिस्तान, ताजिकिस्तान या रशियातून बाहेर पडलेल्या देशांना चिंता वाटू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर, उझबेकिस्तान व ताजिकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेवरील आपली तैनाती वाढविली. तर रशियाने देखील युद्धसरावाच्या निमित्ताने आपले रणगाडे व लष्कर या दोन्ही देशांच्या अफगाण सीमेजवळ आणून ठेवले आहेत.

leave a reply