माओवाद्यांनी घडविलेल्या आयईडी स्फोटांमध्ये तीन जवान जखमी

रायपूर/रांची – छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये सुरक्षादलाच्या जवानांना लक्ष्य करण्यासाठी माओवाद्यांनी घडून आणलेल्या आयईडी स्फोटात ‘आयटीबीपी’चा एक जवान जखमी झाला आहे. तसेच झराखंडच्या लोहर्दगा जिल्ह्यात माओवाद्यांनी घडविलेल्या आयईडी स्फोटात दोन पोलीस जवान जखमी झाले.

आयईडी

शुक्रवारी सकाळी इंडो- तिबेट सीमा पोलीस दलाने (आयटीबीपी) माओवाद्यांविरोधात शोध मोहीम हाती घेतली होती. यावेळी माओवाद्यांनी कोहकमेटा आणि कचपाल मार्गावर आयईडी स्फोट घडवून आणला. या स्फोटात ‘आयटीबीपीच ‘च्या ५३ व्या बटालियच्या चार्ली कंपनीचा जवान जखमी झाला. जखमी झालेल्या जवानांचे नाव मोहीत कुमार आहे. या जवानला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिस अधीक्षक मोहित गर्ग यांनी या बातमीला दुजोरा दिला.

त्याचवेळी विजापूरमध्ये माओवादी कमांडर सुखराम ओयम याने आत्मसमर्पण केले. त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस होते. माओवादी संघटनेला कंटाळून त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. तो भैरमगड क्षेत्र समितीचा कमांडर म्हणून सक्रिय होता. सुखराम २००५ मध्ये माओवादी संघटनेत सहभागी झाला होता. माओवादी संघटनेमध्ये आपापसात वाद होत असल्याचे गेल्या काही घटनांमधून समोर येत आहे. छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात पाच माओवाद्यांची त्यांच्याच सहकाऱ्यांनी हत्या केली होती. तसेच कित्येक माओवादी हे आता माओवाद्यांच्या विचारधारेपासून निराश होऊन हा मार्ग सोडून देत आहेत.

दरम्यान झारखंडमध्येही माओवाद्यांनी घडविलेल्या आयईडी स्फोटात दोन पोलीस जावं जखमी झाले. सीआरपीएफ आणि पोलीस शाही घाट भागात शोध मोहीम राबवत असताना माओवाद्यांनी हा आयईडी स्फोट घडवून आणला.

leave a reply