बिहारमधील तीन पेट्रोलियम प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

पेट्रोलियमनवी दिल्ली – रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोलियम क्षेत्रातील बिहारमधील ९०० कोटी रुपयांचे तीन प्रमुख प्रकल्प लोकार्पित केले. ”पारादीप-हल्दिया-दुर्गापूर पाईपलाईनचे बांकापर्यंत विस्तार, बांका एलपीजी बॉटलिंग प्लांट, चंपारण एलपीजी बॉटलिंग प्लांट हे तीन प्रकल्प बिहारमध्ये रोजगारनिर्मिती करतील आणि यामुळे एलपीजीची मागणी वाढेल. या प्रकल्पांचा बिहारसह उत्तरप्रदेश आणि झारखंडलाही लाभ होईल,” असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला.या व्हर्च्युअल कार्यक्रमाला बिहारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री व पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. बांकापर्यंत विस्तारित केली गेलेली पारादीप- हल्दिया-दुर्गापूर पाईपलाईन १९३ किलोमीटर इतकी आहे. ६३४ कोटी रुपयांची ही इंधनवाहिनी ‘इंडियन ऑईल कोऑपरेशन’ने उभारली असून याची प्रति वार्षिक २.१ लाख मेट्रिक टन(एमएमटीपीए)इतकी क्षमता आहे. तर १३१.७५ कोटी रुपयांच्या बांका एलपीजी बॉटलिंग प्लांटमध्ये वर्षाला ८५ लाख सिलेंडर्स उपल्बध होतील.

पेट्रोलियमतर १३६.४ कोटी रुपयांच्या या चंपारण एलपीजी बॉटलिंग प्लांटमध्ये वर्षाला ८४.५० लाख सिलेंडर्स उपल्बध असतील.महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरते. यामुळे सिलेंडर्सच्या मागण्या पूर्ण होतील. तसेच रोजगाराच्या संधी मिळतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. बिहारच्या पायाभूत सुविधांचा विकास लक्षात घेऊन बिहारसाठी विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली होती. बिहारमध्ये पेट्रोलियम आणि गॅस क्षेत्रातील प्रकल्पांसाठी २१ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. हे प्रकल्प त्याचाच एक भाग ठरत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

बिहारमध्ये समुद्र नसल्यामुळे या राज्यात इंधन प्रकल्प उभारणे मोठे आव्हान होते. पण त्या आव्हानांवर मात करीत ही प्रकल्प उभारली गेले, याचे पंतप्रधानांनी कौतुक केले. तसेच उज्वला योजनेअंतर्गत आठ कोटी गरीब घरांपर्यंत स्वंयपाकाचे गॅस उपल्बध करुन दिल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली.

leave a reply