युक्रेनमधील अमेरिकेच्या जैविक प्रयोगशाळांवर सुरक्षा परिषदेत जोरदार चर्चा होणार

जैविक प्रयोगशाळान्यूयॉर्क/मॉस्को/बीजिंग – अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉन अब्जावधी डॉलर्स ओतून युक्रेनमध्ये लष्करी जैविक प्रयोगशाळा चालवित असल्याचा आरोप रशियाने केला होता. या प्रयोगशाळा म्हणजे जैविक शस्त्रे तयार करण्याचे कारखानेच असल्याचा ठपका रशियाने ठेवला होता. अमेरिकेने हा आरोप फेटाळून उलटे रशियावरच आरोप केले होते. हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत उपस्थित केला जाणार आहे. यासंदर्भातील रशियाच्या या दाव्याला चीन समर्थन देणार असल्याचे उघड झाले आहे.

जैविक प्रयोगशाळाचार दिवसांपूर्वी रशियन लष्कराच्या ‘रेडिएशन, केमिकल अँड बायोलॉजिकल डिफेन्स फोर्सेस’चे प्रमुख इगोर किरीलोव्ह यांनी युक्रेनमधील प्रयोगशाळांमध्ये जैविक शस्त्रांवर संशोधन व त्यांची निर्मिती सुरू होती, असा आरोप केला होता. पेंटॅगॉनचे ‘डिफेन्स थ्रेट रिडक्शन एजन्सी-डिटीआरए’ विभाग आणि ‘ब्लॅक अँड वेच’ ही खाजगी कंपनी युक्रेनमधील ३० प्रयोगशाळांशी जोडलेली असल्याचा दावा रशियाने केला होता. २०२१ साली पेंटॅगॉनने युक्रेनमधील या प्रयोगशाळांना एक कोटी, १८ लाख डॉलर्सचा निधी पुरविला होता, असे सांगून रशियाने याबाबतचे आपल्याकडे पुरावे असल्याचे म्हटले होते.

जैविक प्रयोगशाळायुक्रेनमध्ये अमेरिकेच्या निधीवर चालणार्‍या जैविक प्रयोगशाळा असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या उपमंत्री व्हिक्टोरिया नुलँड यांनी मान्य केले होते. पण ही संशोधन केंद्रे असल्याचे नुलँड यांनी म्हटले होते. तसेच युक्रेन आण्विक किंवा जैविक शस्त्रास्त्रांची निर्मिती करीत असल्याचा आरोप करून रशिया युक्रेनवरील आपल्या हल्ल्याचे समर्थन करीत असल्याचा प्रत्यारोप अमेरिकेने केला होता. पण या प्रयोगशाळा अमेरिकेला रशियाच्या सीमेजवळच का उभारायच्या होत्या, या रशियाच्या प्रश्‍नांना बायडेन प्रशासनाने उत्तर देण्याचे टाळले होते. याउलट रशिया युक्रेनमध्ये रासायनिक किंवा जैविक हल्ला चढवू शकतो, असा इशारा व्हाईट हाऊसने दिला होता.

पण रशियाने युक्रेनमधील जैविक प्रयोगशाळांचा मुद्दा आत्ता संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत नेला आहे. येत्या काही तासात सुरक्षा परिषदेच्या बैठकीत युक्रेनमधील संघर्षावर चर्चा होणार आहे. यात रशिया युक्रेनमधील जैविक प्रयोगशाळा, त्यांना अमेरिकेेचे मिळणारे फंडींग आणि यासंबंधीचे पुरावे मांडणार असल्याच्या बातम्या येत आहेत. अमेरिकेवरील रशियाच्या या आरोपांना चीनचे समर्थन मिळत आहे. सुरक्षा परिषदेमध्ये रशियासह स्थायी सदस्य असलेला चीन युक्रेनमधील जैविक प्रयोगशाळांबाबत चीन पेंटॅगॉनकडे खुलासा मागणार आहे.

दरम्यान, युक्रेनमधील जैविक प्रयोगशाळांच्या मुद्यावरुन रान पेटलेले असताना, जागतिक आरोग्य संघटना ‘डब्ल्युएचओ’ने याबाबत युक्रेनसाठी सूचना जारी केली. युक्रेनच्या यंत्रणांनी संबंधित प्रयोगशाळांमधील धोकादायक जैविक विषाणू तातडीने नष्ट करावे, असे आदेश डब्ल्युएचओने दिले आहेत.

leave a reply