‘साऊथ चायना सी’च्या सागरी क्षेत्रात अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेची विशेष गस्त

गस्तसिंगापूर – अमेरिकेची अजस्त्र विमानवाहू युद्धनौका ‘युएसएस निमित्झ’ साऊथ चायना सीच्या क्षेत्रात गस्तीसाठी दाखल झाली आहे. यावेळी अमेरिकन युद्धनौका आपल्या विनाशिका आणि पाणबुड्यांच्या सहाय्याने ही गस्त पूर्ण करणार आहे. काही दिवसांपूर्वीच चीनच्या विमानवाहू युद्धनौकेने आपल्या ताफ्यासह अमेरिकेच्या गुआम बेटाजवळून गस्त घातली होती. त्यानंतर अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका या क्षेत्रात दाखल झाली आहे. साऊथ चायना सीमधील सरावाच्या निमित्ताने अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका हवाई हल्ले, पाणबुडीभेदी कारवाई तसेच विमाने, हेलिकॉप्टर्सचा सहभाग असलेला स्वतंत्र सराव करणार आहे. दोन महिन्यांपूर्वीच चीनने या सागरी क्षेत्रात गस्त घालणाऱ्या अमेरिकेच्या विनाशिकेला हुसकावून लावल्याचा दावा केला होता. तर काही दिवसांपूर्वी साऊथ चायना सीच्या हवाई क्षेत्रात चीनच्या लढाऊ विमानाने अमेरिकी टेहळणी विमानापासून धोकादायकरित्या प्रवास केला होता.

English हिंदी

leave a reply