इराणविरोधातील इस्रायलच्या कारवायांसाठी अमेरिकेचे बायडेन प्रशासन जबाबदार असेल

- इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा इशारा

तेहरान – ‘इराणमधील लष्करी ठिकाणे, प्रकल्प किंवा इराणी नागरिकांवर इस्रायलने चढविलेल्या कुठल्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यासाठी अमेरिकेचे बायडेन प्रशासन जबाबदार असेल’, असा इशारा इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली शामखानी यांनी दिला. इराणने अण्वस्त्रांची निर्मिती केली तर त्यावरील इस्रायलच्या कारवाईला अमेरिकेचे पूर्ण स्वातंत्र्य असेल, असे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी म्हटले होते. त्यावर शामखानी यांनी हा इशारा दिल्याचा दावा इराणी माध्यमे करीत आहेत. पण काही दिवसांपूर्वी अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या सभापतींनी इस्रायलला दिलेल्या आश्वासनानंतर इराणकडून ही प्रतिक्रिया आल्याचे दिसत आहे.

इराणविरोधातील इस्रायलच्या कारवायांसाठी अमेरिकेचे बायडेन प्रशासन जबाबदार असेल - इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा इशाराअमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन सौदी अरेबियासाठी रवाना होत आहेत. त्याआधी स्थानिक अभ्यासगटाच्या कार्यक्रमात बोलताना सुलिवन यांनी इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत उपस्थित केले जाणारे प्रश्न व इस्रायलची सुरक्षा याबाबत महत्त्वाची विधाने केली होती. इराणचा अणुकार्यक्रम अतिशय वेगाने विकसित झाला असून क्षेत्रीय तसेच जागतिक सुरक्षेसाठी तो धोकादायक बनल्याची कबुली सुलिवन यांनी दिली होती.

इराणचा हा अणुकार्यक्रम रोखण्यासाठी बायडेन प्रशासन वचनबद्ध आहे व आमच्या रोजच्या चर्चेमध्ये या मुद्याला प्राधान्य दिले जाते. पण राजनैतिक स्तरावर हा प्रश्न सोडविण्यासाठी बायडेन प्रशासन महत्त्व देत असल्याचे सुलिवन म्हणाले होते. इराणविरोधातील इस्रायलच्या कारवायांसाठी अमेरिकेचे बायडेन प्रशासन जबाबदार असेल - इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा इशारात्याचबरोबर इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही व यासाठी इस्रायलने हाती घेतलेल्या कारवाईला बायडेन प्रशासनाचे समर्थन असेल, अशी माहिती सुलिवन यांनी सदर अभ्यासगटाच्या कार्यक्रमात दिली होती.

सौदी अरेबियाच्या आपल्या दौऱ्यातही इस्रायल आणि सौदीमध्ये सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुलिवन यांनी म्हटले होते. अमेरिकी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या या घोषणेवर इराणमधून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. इराणविरोधातील इस्रायलच्या कारवायांसाठी अमेरिकेचे बायडेन प्रशासन जबाबदार असेल - इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा इशारा‘इराणमधील प्रकल्प आणि नागरिकांवरील इस्रायलच्या दहशतवादी कारवायांना पाठिंबा देऊन अमेरिकाच इस्रायलच्या या कारवायांची जबाबदारी घेत आहे. इराणवर हल्ला झालाच तर त्याच्या परिणामांसाठीही अमेरिकेने तयार रहावे’, असा इशारा इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली शामखानी यांनी दिला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाचे सभापती केविन मॅक्कार्थी यांनी इस्रायलचा दौरा केला होता. बायडेन प्रशासनाने इराणबाबत मवाळ भूमिका स्वीकारली तरी अमेरिकेचे प्रतिनिधीगृह काही झाल्या इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार, असे आश्वासन मॅक्कार्थी यांनी दिले होते. त्याचबरोबर इराणविरोधी कारवाईसाठी अमेरिकेकडून इस्रायलला मिळणारे आर्थिक व लष्करी सहाय्य यापुढेही सुरू राहील, असे सांगून मॅक्कार्थी यांनी बायडेन प्रशासनाला चपराक लगावली होती. प्रतिनिधीगृहाच्या सभापतींनी इस्रायलला दिलेल्या या आश्वासनामुळे अस्वस्थ झालेल्या इराणकडून ही प्रतिक्रिया आल्याचे दिसत आहे.

हिंदी

 

leave a reply