बायडेन-नेत्यान्याहू यांच्यातील वाद विकोपाला गेलेला असताना अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाचे सभापती इस्रायल भेटीवर

जेरूसलेम – इराण आणि इतर मुद्यांमुळे बायडेन प्रशासन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. याचा परिणाम म्हणून बायडेन प्रशासनाने इस्रायलच्या नेत्यांना व्हाईट हाऊसची भेट नाकारल्याच्या बातम्या आल्या होत्या. अशा परिस्थितीत अमेरिकन लोकप्रतिनिधीगृहाचे सभापती केव्हिन मॅक्कार्थी यांनी इस्रायलचा दौरा करुन पंतप्रधान नेत्यान्याहू यांना आश्वासन दिले. येत्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी नेत्यान्याहू यांना अमेरिका भेटीवर आमंत्रित केले नाही, तर आपणच इस्रायली पंतप्रधानांना आमंत्रित करू, अशी घोषणा मॅक्कार्थी यांनी केली.

बायडेन-नेत्यान्याहू यांच्यातील वाद विकोपाला गेलेला असताना अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाचे सभापती इस्रायल भेटीवरअमेरिकन लोकप्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष मॅक्कार्थी यांनी सोमवारी इस्रायलच्या संसदेला संबोधित केले. इस्रायलच्या स्वातंत्र्याचे हे ७५वे वर्षे आहे. इस्रायलच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत अमेरिका इस्रायलचा मित्रदेश राहिला आहे व यापुढेही असेल. अमेरिकेत कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी इस्रायलला द्वीपक्षीय समर्थन कायम होते, याची आठवण मॅक्कार्थी यांनी करुन दिली. पण गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेतील हे द्वीपक्षीय समर्थन कमी होत चालल्याची टीका करुन मॅक्कार्थी यांनी बायडेन प्रशासनाला लक्ष्य केले.

इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी न्यायालयीय सुधारणा आणि वेस्ट बँकबाबत स्वीकारलेल्या भूमिकेवर बायडेन प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर नेत्यान्याहू यांच्या सरकारमधील जहालमतवादी नेत्यांच्या निवडीवरही बायडेन प्रशासन नाखूश आहे. बायडेन-नेत्यान्याहू यांच्यातील वाद विकोपाला गेलेला असताना अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाचे सभापती इस्रायल भेटीवरकाही दिवसांपूर्वी बायडेन प्रशासनाने नेत्यान्याहू यांच्या सरकारमधील काही नेत्यांना अमेरिकेत आमंत्रितही करणार नसल्याचे संकेत दिले होते. आत्तापर्यंतच्या इस्रायलच्या पंतप्रधानांना अमेरिकेने सर्वात आधी व्हाईट हाऊस भेटीचे आमंत्रण दिले होते.

पण नेत्यान्याहू यांनी इस्रायलची सूत्रे हाती घेऊन चार महिने उटल्यानंतरही व्हाईट हाऊसकडून तसे आमंत्रण आलेले नाही. या पार्श्वभूमीवर, मॅक्कार्थी यांनी बायडेन यांच्या विरोधानंतरही इस्रायलच्या पंतप्रधानांना अमेरिका भेटीचे आमंत्रण देणार असल्याची घोषणा केली. याद्वारे मॅक्कार्थी यांनी बायडेन प्रशासनाला आव्हान दिल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली आहे.

हिंदी English

 

leave a reply