आखाती क्षेत्रातील लष्करी कारवाईसाठी राखून ठेवलेला इस्रायलमधील शस्त्रसाठा अमेरिका युक्रेनसाठी पाठवित आहे

- अमेरिकन वर्तमानपत्राचा दावा

शस्त्रसाठावॉशिंग्टन – आखातातील लष्करी कारवाईसाठी अमेरिकेने इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जमा करून ठेवला होता. पण अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय ‘पेंटॅगॉन’ने यातील काही शस्त्रास्त्रे गोपनीयरित्या युक्रेनसाठी रवाना केली आहेत. यामुळे रशियाबरोबरचे आपले संबंध बिघडतील, असा आक्षेप इस्रायलने नोंदविल्यानंतरही पेंटॅगॉन युक्रेनला हे लष्करी सहाय्य पुरवित आहे, असा दावा अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्राने केला.

शस्त्रसाठागेल्या अकरा महिन्यांपासून रशियाबरोबर सुरू संघर्षात युक्रेनकडील सोव्हिएत कालिन युद्धसाहित्ये अपुरी पडत आहेत. अमेरिका व युरोपिय देशांनी कितीही दावे केले तरी या युद्धात युक्रेनच्या लष्कराला जबरदस्त हानी सोसावी लागत आहे. म्हणूनच नाटो व सहकारी देशांकडून युक्रेनला मोठ्या प्रमाणात लष्करी सहाय्य पुरविले जात आहे. इस्रायलने देखील युक्रेनला लष्करी सहाय्य करावे, यासाठी अमेरिकेने दबाव टाकला होता. पण युक्रेनला शस्त्रसाठा पुरविल्यास रशियाकडून सिरियातील हवाई हल्ल्यांसाठी मिळालेली परवानगी गमावली असती, या भीतीपोटी इस्रायलने अमेरिकेला नकार कळविला होता.

शस्त्रसाठापण ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने प्रसिद्ध केलेल्या बातमीत अमेरिकेने इस्रायलमधील शस्त्रसाठा युक्रेनला पुरविल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने आखाती क्षेत्रातील लष्करी कारवाईसाठी इस्रायलमध्ये प्रचंड प्रमाणात शस्त्रसाठा करून ठेवला आहे. मोक्याच्या क्षणी अमेरिकेने इस्रायलला देखील या शस्त्रसाठ्याचा वापर करण्याची परनवागी होती. पण अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने यापैकी मोठा शस्त्रसाठा युक्रेनसाठी रवाना केल्याची माहिती अमेरिका व इस्रायली अधिकाऱ्यांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सदर वर्तमानपत्राला दिली. अमेरिका इस्रायलमधील कोठारातून जवळपास तीन लाख तोफगोळे युक्रेनी लष्कराच्या तोफांसाठी रवाना करणार आहे. यापैकी 155 मिलिमीटर प्रकारातील जवळपास दीड लाख तोफगोळे अमेरिकेने रवाना केले आहेत. पूर्व युरोपातील पोलंडमार्गे सदर तोफगोळ्यांचे कंटेनर्स युक्रेनमध्ये दाखल होतील, अशी माहिती अमेरिकी व इस्रायली अधिकाऱ्यांनी दिली. अमेरिकेने युक्रेनसाठी हे तोफगोळे कधी रवाना केले, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण इस्रायलबरोबरच दक्षिण कोरियातूनही अमेरिका युक्रेनसाठी शस्त्रसाठा रवाना करीत आहे. युक्रेनचे लष्कर रशियावर हल्ल्यासाठी दरमहिना जवळपास 90 हजार तोफगोळ्यांचा वापर करीत आहे.

इस्रायलचे रशिया तसेच युक्रेनबरोबर मैत्रीपूर्ण राजनैतिक संबंध आहेत. यापैकी रशिया व इस्रायलमधील सहकार्य अधिक मजबूत मानले जाते. सिरियातील दहशतवादी ठिकाणांवरील हवाई हल्ल्यासाठी रशियाने इस्रायलला मूक संमती दिली आहे. अशा परिस्थितीत, युक्रेनला लष्करी सहाय्य करून इस्रायलला सिरियाप्रश्नी रशियाचे सहकार्य गमवायचे नाही. गेल्याच महिन्यात इस्रायलच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेणाऱ्या बेंजामिन नेत्यान्याहू यांनी रशियाबरोबरच्या सहकार्याला महत्त्व दिले होते. त्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेतील वर्तमानपत्रातून इस्रायलमधील शस्त्रसाठा युक्रेनला पुरविल्याची बातमी प्रसिद्ध होण्याचे औचित्य महत्त्वाचे ठरते.

हिंदी

leave a reply