रशियाच्या वाढत्या लष्करी हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेकडून फिनलंड व ग्रीसबरोबर संरक्षणकरार

वॉशिंग्टन/हेलसिंकी/अथेन्स – रशियाने युरोप व नजिकच्या क्षेत्रातील लष्करी हालचालींना वेग दिला असून युक्रेनच्या मुद्यावरून पाश्‍चात्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यास युरोपच्या सुरक्षेला धोका उत्पन्न होईल, असा इशाराही दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने युरोपिय देशांची संरक्षणक्षमता बळकट करण्यासाठी पावले उचलली आहेत. फिनलंड तसेच ग्रीसबरोबरच्या संरक्षणकरारांना मान्यता देण्यात आली आहे. या करारांनुसार, फिनलंडला ६४ ‘एफ-३५’ लढाऊ विमाने व ग्रीसला चार नव्या युद्धनौका पुरविण्यात येणार आहेत.

रशियाच्या वाढत्या लष्करी हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेकडून फिनलंड व ग्रीसबरोबर संरक्षणकरारफिनलंडच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी, अमेरिकेच्या ‘लॉकहिड मार्टिन’कडून ६४ ‘एफ-३५’ लढाऊ विमाने खरेदी करण्यात येतील असे जाहीर केले. करारात, संरक्षणयंत्रणा तसेच देखभाल व दुरुस्तीच्या कंत्राटाचाही समावेश आहे. यासाठी ११ अब्ज डॉलर्सहून अधिक खर्च येणार असल्याचे फिनलंडकडून सांगण्यात आले. अमेरिकेकडून ‘एफ-३५’ ही ‘फिफ्थ जनरेशन जेट्स’ खरेदी करणारा फिनलंड हा जगातील १४वा देश ठरला आहे. पहिले ‘एफ-३५’ २०२६ साली फिनलंडमध्ये दाखल होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

फिनलंडकडून ‘एफ-३५’ची निवड झाल्यानंतर फ्रान्स व स्वीडनकडून नाराजीचे सूर उमटले आहेत. फिनलंडच्या लढाऊ विमानांच्या प्रस्तावात फ्रान्सची ‘डॅसॉल्ट’ व स्वीडनच्या ‘साब’चाही समावेश होता. मात्र या कंपन्यांचे प्रस्ताव नाकारण्यात आल्याने संबंधित देशांनी नाराजी व्यक्त केली. रशियाच्या वाढत्या लष्करी हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेकडून फिनलंड व ग्रीसबरोबर संरक्षणकरारयुरोपिय देशाने पुन्हा एकदा अमेरिकेला प्राधान्य देणे हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया फ्रेंच कंपनीच्या अधिकार्‍यांनी दिली.

दरम्यान, अमेरिकेने ग्रीसला चार नव्या युद्धनौका पुरविण्याच्या कराराला मंजुरी दिली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केले. हा करार ९.४ अब्ज डॉलर्सचा असून ग्रीसला ‘मल्टी मिशन सरफेस कॉम्बॅटन्ट’ प्रकारातील युद्धनौका पुरविण्यात येणार आहेत. अमेरिकेच्या नौदलात सध्या सक्रिय असणार्‍या ‘लिटोरल कॉम्बॅट शिप’च्या धर्तीवर या युद्धनौकांची उभारणी करण्यात आली आहे. नव्या युद्धनौकांबरोबरच सध्या ग्रीसच्या नौदलात असणार्‍या ‘मेको क्लास’ विनाशिकांचे आधुनिकीकरणही करण्यात येणार आहे. काही महिन्यांपूर्वीच अमेरिका व ग्रीसमध्ये दीर्घकालिन संरक्षणसहकार्य करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या होत्या. या करारात ग्रीसमधील अमेरिकेची संरक्षणतैनाती वाढविण्याची तरतूद आहे.

leave a reply