व्हेनेझुएलातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करण्याचे आदेश

venezuela-newsकॅराकस – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांनी देशातील विरोधी पक्षनेत्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्यावर देशद्रोह व गैरव्यवहारांचे आरोप ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. पुढच्या वर्षी व्हेनेझुएलात राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असून या पार्श्वभूमीवर ही कारवाई लक्ष वेधून घेणारी ठरते.

2019 साली व्हेनेझुएलाच्या संसदेने निकोलस मदुरो यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्यता देण्याचे नाकारले होते. त्यानंतर व्हेनेझुएलात प्रचंड राजकीय व सामाजिक अस्थैर्य निर्माण झाले असून देश अराजकाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे इशारे देण्यात आले आहेत. मात्र मदुरो यांनी सत्ता सोडण्यास नकार दिला असून विरोधक म्हणजे चोरांची टोळी असल्याचे आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर, विरोधी पक्षांनी पुढील वर्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

गेल्या आठवड्यात दिनोरा फिगेरा यांची विरोधकांच्या नव्या नेत्या म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांनी मदुरो यांची राजवट उलथण्यासाठी लढा अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

leave a reply