उझबेकिस्तानातील हिंसाचारात 18 ठार

हिंसाचारातअल्माटी – उझबेकिस्तानमध्ये सरकारविरोधात पेटलेल्या संघर्षात 18 जणांचा बळी गेला तर 243 जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पाचशेहून अधिक जणांना ताब्यात घेतल्याची माहिती उझबेकिस्तानच्या सरकारने दिली. यानंतर सदर भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शावकत मिर्झियोएव्ह यांनी काही दिवसांपूर्वी कराकलपाकस्तान या प्रांताला दिलेली स्वायत्तता काढून घेण्याची घोषणा केली होती. अराल समुद्राजवळ असलेला कराकलपाकस्तान हा कझाक अल्पसंख्यांकांचे प्राबल्य असलेला भूभाग म्हणून ओळखला जातो. आपल्या प्रांताची स्वायत्तता काढून घेण्याच्या घोषणेनंतर कराकलपाकस्तानात मोठा हिंसाचार भडकला.

गेल्या दोन दशकात उझबेकिस्तानात भडकलेला हा सर्वात भीषण हिंसाचार ठरला. यामध्ये 18 जणांचा बळी गेला असून यात दोन जवानांचा समावेश आहे. काही निदर्शकांनी प्रशासकीय इमारतीत प्रवेश केल्याच्या बातम्याही आल्या होत्या. काही ठिकाणी हिंसाचाराच्या मोठ्या घटना घडल्यानंतर राष्ट्राध्यक्ष मिर्झियुोएव्ह यांनी संचारबंदी लागू केली आहे.

leave a reply