जळगावात ट्रक उलटून झालेल्या अपघातात १६ जणांचा बळी

ट्रक उलटूनजळगाव – जळगाव जिल्ह्यात पपयाने भरलेला एक ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात १६ जणांचा बळी गेला आहे. यामध्ये तिघा मुलांचा समावेश आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने अपघातात बळी गेलेल्यांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील बर्‍हाणपूर-अंकलेश्‍वर महामार्गावर सोमवार पहाटे भीषण अपघात झाला. धुळे जिल्ह्यातील शहादा येथून हा पपयाने भरलेला ट्रक रावेरकडे जात होता. हा ट्रकमध्ये माल भरल्यानंतर तो उतरविण्यासाठी काही हातमजूरही ट्रकमधूनच यावलकडे निघाले होते. यामध्ये या मजूरांचे कुटुंबियही होते. मात्र रस्त्यातच काळाने घाला घातला. चालकाचे नियत्रंण सुटून महामार्गावर हा ट्रक पलटी झाला. किनगाव नजीक हा भीषण अपघात झाला.

यामध्ये १५ मजूर जागीच जण जागीच ठार झाले. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये तीन, पाच आणि १५ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. यातील ११ जण हे अभोड या एकाच गावातील होते. यामुळे या गावात शोककळा पसरली आहे.

leave a reply