महाराष्ट्रात चोवीस तासात कोरोनाचे १६,६२० नवे रुग्ण

नवी दिल्ली/मुंबई – महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येने चिंता आणखीनच वाढविल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात १५ हजाराहून अधिक रुग्ण आढळत होते. तेच रविवारी चोवीस तासात आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या १६ हजारांच्या पुढे पोहोचली आहे. तसेच ५० जणांचा मृत्यु झाला आहे. देशात कोरोनाच्या अ‍ॅक्टीव्ह केसेसची संख्या २ लाख १० हजारांवर पोहोचली आहेत. यातील १ लाख २६ हजार रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. यामुळे राज्यात ‘लॉकडाऊन’चे संकट बळावत चालल्याचे दिसत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा निर्वाणीचा इशारा देताना नियम पाळले नाहीत, तर कठोर निर्णय घेतल्याशिवाय गत्यंतर नसेल, असे स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या साथीचे नवे रुग्ण वाढत चालले आहेत. रविवारी १६ हजार ६२० नव्या रुग्णांची नोंद महाराष्ट्रात करण्यात आली. मुंबईतच या साथीच्या सुमारे २ हजार नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली, तर ७ जणांचा बळी गेला. ठाणे मंडळात ३ हजार ६७६ नवे रुग्ण आढळले आहेत, तर ११ जण दागवले आहे.

याशिवाय विदर्भातही जिल्हा प्रशसनांनी व महापालिका प्रशासनांनी ‘लॉकडाऊन’, रात्रीच्या कर्फ्युचे निर्णय घेऊनही रुग्णांची संख्येत घट दिसून आलेली नाही. नागपूर मंडळात २ हजार ८६२ नवे रुग्ण आढळले आहेत, तसेच १२ जणांचा यासाथीमुळे बळी गेला आहे. अकोला विभागात १ हजार ३८८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. औरंगाबाद मंडळात १२८९ नवे रुग्ण आढळले आहेत.

पुणे मंडळात कोरोनाच्या ३ हजार ६०९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहेे. ठाणे मंडळानंतर सर्वाधिक रुग्ण हे पुणे मंडळात आढळले आहेत. सध्या राज्यात अमरावती, नागपूर, अकोला, परभणी या जिल्ह्यांमध्ये ‘लॉकडाऊन’ सारखी कठोर पावले उचलण्यात आली आहेत. रविवारी लातूरमध्ये नाईट कर्फ्युची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येला थोपविण्यसाठी राज्यात पुन्हा ‘लॉकडाऊन’ची शक्यता वारंवार व्यक्त केली जात आहेत. मुख्यमंत्रीही याबाबत वारंवार इशारा देत आहेत. ‘लॉकडाऊन’ लावण्याची इच्छा नसली, तरी परिस्थिती हाताबाहेर गेल्यास कठोर निर्णय घेण्यावाचून गत्यंतर नसेल, असा इशारा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

दरम्यान शनिवारपासून रविवारच्या सकाळपयर्र्ंत देशभरात २५ हजार ३२० नवे रुग्ण आढळले. नोव्हेंबरनंतर प्रथमच देशात चोवीस तासात आढळलेल्या रुग्णांची संख्या या पातळीवर पोहोचली आहे. यामध्ये ६० टक्के रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. तसेच देशात आढळत असलेल्या एकूण रुग्णांच्या ८७ टक्के रुग्ण हे ६ राज्यात नोंदविले जात असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटले आहे.

leave a reply