‘डीआर काँगो’मध्ये प्रार्थनास्थळात झालेल्या बॉम्बस्फोटात 17 ठार

17 ठारकंपाला – आफ्रिकेतील ‘डीआर काँगो’च्या कासिंदी शहरातील ख्रिस्तधर्मियांच्या प्रार्थनास्थळावर दहशतवाद्यांनी घडविलेल्या बॉम्बहल्ल्यात 17 जणांचा बळी गेला. ‘आयएस’शी संलग्न असलेल्या ‘अलायड् डेमोक्रॅटिक फोर्सेस-एडीएफ’ या दहशतवादी संघटनेने हा स्फोट घडविल्याचा संशय व्यक्त केला जातो.

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो अर्थात डीआर काँगोच्या उत्तर किवू प्रांतातील प्रार्थनास्थळात ऐन गर्दीच्या वेळी बॉम्बस्फोट झाला. डीआर काँगोच्या राष्ट्राध्यक्षांनी या हल्ल्यावर संताप व्यक्त करून दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. युगांडामधून पलायन केलेली आणि डीआर काँगोच्या काही भागात दडून बसलेल्या एडीएफने हा स्फोट घडविल्याचा दावा लष्कर करीत आहे. युगांडा तसेच डीआर काँगोतील सरकार उधळून लावण्याचा इरादा ठेवून एडीएफ दहशतवादी हल्ले चढवित असल्याचा आरोप याआधी झाला होता.

डीआर काँगोमध्ये छोट्या-मोठ्या 120 कट्टरपंथी, दहशतवादी आणि बंडखोर टोळ्या आहेत. यापैकी एडीएफ ही सर्वात मोठी दहशतवादी संघटना असून एडीएफच्या दहशतवाद्यांनी स्थानिकांची भीषण हत्याकांड घडविलेले होते.

हिंदी

leave a reply