अल-शबाबच्या बॉम्बहल्ल्यांनी सोमालिया हादरले

- 15 ठार, 50 जखमी

सोमालिया हादरलेमोगादिशू – सोमालियाच्या हिरशाबेले प्रांतात अल-शबाबच्या दहशतवाद्यांनी घडविलेल्या तीन बॉम्बस्फोटांमध्ये 15 जण ठार तर 50 जखमी झाले. यामध्ये एका आत्मघाती हल्ल्याचा समावेश होता. जिबौतीचे शांतीसैनिक तैनात असलेल्या आफ्रिकन महासंघाच्या लष्करी तळाजवळ हा आत्मघाती स्फोट झाल्यामुळे याचे महत्त्व वाढले आहे.

हिरशाबेले प्रांतातील जलालक्सी आणि बुलोबार्डे ही दोन शहरे गेली दहा वर्षे अल-शबाबच्या नियंत्रणाखाली होती. पण गेल्या काही महिन्यांपासून सोमालियाचे राष्ट्राध्यक्ष हसन शेख मोहमूद यांनी दहशतवाद्यांविरोधात संघर्ष पुकारला होता. त्यानंतर सोमालियन लष्कराने अल-शबाबच्या दहशतवाद्यांना पिटाळून स्थानिकांचे समर्थन मिळविले होते. यामुळे खवळलेल्या अल-शबाबने सदर शहरे पुन्हा ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर अल-शबाबने जलालक्सी आणि बुलोबार्डे शहरांमध्ये दहशतवादी हल्ले झाले आहेत.

यापैकी जलालक्सी शहरामध्ये आफ्रिकन महासंघातील जिबौती या देशाचे शांतीसैनिक तैनात असलेल्या लष्करी तळाजवळ दहशतवाद्याने आत्मघाती स्फोट झाला. सोमालियातील या दहशतवादी हल्ल्यांवर संयुक्त अरब अमिरात-युएईने देखील चिंता व्यक्त केली. तसेच या दहशतवादविरोधी युद्धात सोमालियाच्या लष्कराचे युएईने समर्थन केले आहे.

हिंदी

leave a reply