पाकिस्तानकडून गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये २० हजार जवान तैनात

नवी दिल्ली – लडाखमध्ये चीनने मोठ्या प्रमाणात लष्कराची तैनाती करुन भारताला आव्हान दिलेले असतानाच, पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये २० हजार अतिरिक्त जवान तैनात केले आहेत. यामुळे एकाचवेळी भारताला दोन आघाड्यांवर लक्ष देण्यास भाग पाडून जेरीस आणण्याचा कट या दोन्ही देशांनी आखला आहे. त्याचवेळी जम्मू-काश्मीरमध्ये घातपात माजविण्यासाठी पाकिस्तानसह चीन देखील कारस्थाने करू लागला असून यासाठी अल-बद्र या दहशतवादी संघटनेशी हातमिळवणी केली आहे. याआधी चीनने सुरक्षा परिषदेत नकाराधिकार वापरुन पाकिस्तानी दहशतवादी संघटनांवरील कारवाया रोखल्या होत्या. आता या दहशतवादी भारतात हल्ले चढवून चीन या उपकाराच्या परतफेडीची अपेक्षा करीत असल्याचे दिसते.

Gilgit-Pakistanलडाखच्या उत्तरेकडील गिलगिट-बाल्टिस्तानच्या सीमेजवळ पाकिस्तानने २० हजार जवानांना तैनात केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर, ही तैनाती झाल्याचा दावा केला जातो. या सैन्य तैनातीबरोबर पाकिस्तानने सदर भागात रडारही कार्यान्वित केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी गिलगिट-बाल्टिस्तानच्या ‘स्कार्दू’ हवाईतळावर चीनने ‘आयएल-७८’ इंधनवाहू विमान उतरविल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले होते. त्याचबरोबर चीन गिलगिट-बाल्टिस्तानमधील पाकिस्तानच्या हवाईतळांचा ताबा घेत असल्याची लक्षवेधी माहिती समोर आली होती.

चीनने पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचा वापर भारताविरोधात करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. चीनचे अधिकारी पाकिस्तानस्थित अल-बद्र या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. आयएसआय, अल-बद्र यांना हाताशी घेऊन चीनने जम्मू-काश्मीरमधील भारतीय सैनिकांवर हल्ला चढवण्याचा कट आखला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचारासाठी प्रसिद्ध असलेल्या या दहशतवादी संघटनेचे अस्तित्व काही वर्षांपूर्वी संपुष्टात आले होते. पण चीन पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटनेला पुन्हा उभी करत असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे. महिन्याभरापूर्वी जम्मू-काश्मीरच्या आयुक्तांनी देखील अल-बद्रबद्दल इशारा दिला होता. गुप्तचर यंत्रणांच्या या माहितीमुळे चीन भारताविरोधात पाकिस्तानी लष्कराबरोबर या देशाच्या दहशतवाद्यांना देखील वापरत असल्याचे उघड झाले आहे.

Gilgit-Pakistanदरम्यान, चीन आणि पाकिस्तान भारताच्या विरोधात लष्करी तैनाती करुन दडपण वाढवू पाहत आहेत, पण कधीतरी देशाला या दोन आघाड्यांवर एकाचवेळी संघर्ष करावा लागेल, याची पूर्वकल्पना भारतीय लष्कराला होती. म्हणूनच या दोन्ही आघाड्यांवरील संघर्षासाठी भारतीय संरक्षणदलांनी सज्जता ठेवलेली आहे. त्याचवेळी दहशतवाद्यांची पाठराखण करणारे हे दोन्ही शेजारी देश घात्पात माजवण भारतात अस्थैर्य माजवतील याचीही पुरेपूर जाणीव भारतीय लष्कराला आहे. याकरिता, भारतीय लष्कराने या अडीच आघाड्यांवरील संघर्षाचा सामना करण्याचीही सज्जता ठेवलेली आहे. त्यामुळे, भारताच्या विरोधात लष्करी तैनाती वाढवून भारतावर दडपण आणण्याचा चीन व पाकिस्तानचा डाव यशस्वी होण्याची शक्यता नाही. उलट याचे विपरीत परिणाम चीन आणि पाकिस्तानलाच भोगावे लागण्याची दात शक्यता आहे.

leave a reply