सोमालियातील दहशतवादी हल्ल्यात 21 जणांचा बळी

- 30 तासांच्या ओलिसनाट्यानंतर लष्कराकडून शंभराहून अधिक जणांची सुटका

दहशतवादी हल्ल्यात 21 जणांचा बळीमोगादिशु – सोमालियाची राजधानी मोगादिशुमधील हॉटेलवर झ्ाालेल्या दहशतवादी हल्ल्यात 21 जणांचा बळी गेला असून 110हून अधिक जखमी झ्ााले आहेत. शुक्रवारच्या संध्याकाळी हयात हॉटेलवर झ्ाालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तब्बल 30 तासांनी हा हॉटेलमधील कारवाई थांबली असून 106 ओलिसांची सुटका केल्याची माहिती लष्कराने दिली. ‘अल शबाब’ या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गेल्याच आठवड्यात अमेरिकेने ‘अल शबाब’विरोधात कारवाई करून 13 दहशतवाद्यांना ठार केले होते.

शुक्रवारी संध्याकाळी अल शबाब या दहशतवादी संघटनेने राजधानी मोगादिशुतील हयात हॉटेलबाहेर दोन आत्मघाती स्फोट घडवीत हल्ला चढविला. या स्फोटानंतर काही दहशतवादी हॉटेलमध्ये घुसले व त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. स्फोटानंतर तातडीने या भागात लष्करी पथके दाखल झ्ााली. हॉटेलच्या वरच्या मजल्यावर दहशतवाद्यांनी काही जणांना ओलिस धरल्याने लष्कराची कारवाई लांबल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रविवारी पहाटेच्या सुमारास लष्कराला हॉटेलमधील ओलिसांची सुटका करण्यात यश आले. लष्कराच्या कारवाईत दहशतवादी मारले गेले आहेत. मात्र त्यांची संख्या जाहीर केलेली नाही. तर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 21 जणांचा बळी गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 117 जण जखमी असून त्यातील 40 जण गंभीर जखमी आहेत. संयुक्त राष्ट्रसंघटनेचे महासचिव अँटोनिओ गुतेरस तसेच तुर्की व आफ्रिकी नेत्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. मे महिन्यात हसन शेख मोहमद यांनी देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यानंतर राजधानी मोगादिशुत झ्ाालेला हा अल शबाबचा पहिलाच हल्ला ठरतो.

अल शबाब गेली 15 वर्षे सोमालियावर वर्चस्व मिळविण्यासाठी दहशतवादी कारवाया करीत आहे. ‘अल कायदा’शी संलग्न असलेल्या या गटाने दक्षिण तसेच मध्य सोमालियातील काही भागांचा ताबाही मिळविला आहे. सोमालियन लष्कर, आफ्रिकी महासंघाची शांतीसेना व अमेरिका या देशात दहशतवादविरोधी मोहीम राबवीत आहे. पण त्याला मिळालेले यश मर्यादित असल्याचे अल शबाबच्या नव्या दहशतवादी हल्ल्याने दाखवून दिले आहे.

leave a reply