इराणने आण्विक वाटाघाटीतील ‘रेड लाईन’ काढून टाकली

- अणुकरार फिस्कटेल अशी इस्रायलची अपेक्षा

‘रेड लाईन’जेरूसलेम/तेहरान – ‘रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स’ला दहशतवादी संघटनेच्या यादीतून वगळल्यानंतरच अणुकरार शक्य होईल, अशी ‘रेड लाईन’ इराणने अमेरिकेसमोर आखली होती. यामुळे अणुकरारावरील वाटाघाटी रखडल्या होत्या. पण इराणने आत्ता ही मागणी मागे घेतली आहे. यामुळे आम्ही अणुकराराच्या जवळ पोहोचत आहोत, असा दावा बायडेन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने केला. या बातमीमुळे सावध झ्ाालेल्या इस्रायलने हा अणुकरार फिस्कटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

2018 साली अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सला दहशतवादी संघटना घोषित केले होते. बायडेन प्रशासन रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सना दहशतवादी संघटनेच्या यादीतून वगळत नाही, तोपर्यंत अणुकरार शक्य नसल्याचे इराणने ठणकावले होते. ही आपली रेड लाईन असल्याची घोषणाच इराणने केली होती. तर बायडेन प्रशासनाने इराणची ही मागणी मान्य करणार नसल्याची भूमिका घेतली होती. पण इराणनेच ही रेड लाईन काढून टाकल्याची बातमी अमेरिकेतील वृत्तवाहिनीने बायडेन प्रशासनातील अधिकाऱ्याच्या हवाल्याने प्रसिद्ध केली.

‘रेड लाईन’इराणच्या या निर्णयामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडलेला अणुकरार मार्गी लागत आहे, असा दावा या अधिकाऱ्याने केला आहे. व्हाईट हाऊसने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण अमेरिकन वृत्तवाहिनीने व इस्रायलच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने देखील इराणने तडजोडीची तयारी दाखविल्यानंतर अणुकरार अखेरच्या टप्प्यात आल्याची बातमी प्रसिद्ध केली. पण यानंतरही अणुकरार शक्य होणार नसल्याचा दावा इस्रायली अधिकाऱ्याने केला आहे. लवकरच अणुकरारावरील या वाटाघाटी फिस्कटतील, असे या इस्रायली अधिकाऱ्याने म्हटले आहे.

दरम्यान, इस्रायलच्या विनाशाच्या घोषणा करणाऱ्या इराणबरोबर अमेरिकेने अणुकरार करू नये, अशी मागणी इस्रायलने याआधी केली होती. तरीही हा अणुकरार झ्ाालाच तर इस्रायल त्याच्याशी बांधिल नसेल, असे इस्रायलने ठणकावले होते. त्याचबरोबर इराणच्या आण्विक व लष्करी ठिकाणांवर हल्ल्याची जय्यत तयारी इस्रायलने केली असून यासाठी इस्रायलला आखाती क्षेत्रातील इराणविरोधी देशांचा पाठिंबा मिळत आहे.

leave a reply