पठाणकोटमध्ये ‘लश्कर’च्या तीन दहशतवाद्यांना अटक

Pathankoat-Terroristsचंदीगड/ श्रीनगर – पठाणकोटमध्ये ‘लश्कर-ए-तोयबा’च्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पंजबामार्गे जम्मू काश्मीरमध्ये शस्त्रास्त्रांच्या तस्करीचे रॅकेट यामुळे उद्वस्थ झाले आहे. दहशतवादी हल्ला घडविण्यासाठी ही शस्त्रात्रे पोहोचविण्याची जबाबदारी या तीन दहशतवाद्यांवर होती. त्यामुळे मोठा दहशतवादी हल्लाही उधळला गेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान पंजाबमार्गे शस्त्रास्त्रांची तस्करी करीत असल्याचे समोर आले आहे.

गुरुवारी पठाणकोट भागात कारवाई करत आमिर हुसेन वाणी आणि वासिम हसन वानी या ‘लश्कर’च्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. या दोघांकडून दहा हँड ग्रेनेड, एके-४७ रायफल, २ मॅगझीन आणि ६० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. या दोघांच्या चौकशीत त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचे नाव समोर आले होते. या तिसऱ्या साथीदाराला शनिवारी अटक करण्यात आली. जावेद मोहम्मद बट असे या तिसऱ्या दहशतवाद्याचे नाव आहे. हे तिघेही काश्मिरी असून या तिघांच्या चौकशीत आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे.

Pathankoat-Terroristsपंजाब सीमेवरून पाकिस्तानातून होणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या तस्करीच्या घटना वाढल्या आहेत. जम्मू-कश्मिरमधून ३७० कलम हटविल्यानंतर पंजाबमध्ये दहशतवादी हालचाली वाढ झाली आहे. राज्यात शस्त्र तस्करीची काही रॅकेट नष्ट करण्यात आली आहेत. तसेच ड्रोनद्वारेही पाकिस्तानातून शस्त्र तस्करीही उघड झाली होती. त्यामुळे या तिघांच्या अटकेचे महत्व वाढले आहे.

दरम्यान जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षादलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. या आठवड्याच्या सुरुवातीला तीन निरनिराळ्या चकमकीत हिजबुलच्या १४ दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते. त्यानंतर कुलगाममध्येही हिजबुलचे दहशतवादी मारले गेले आहेत.

leave a reply