डीआर काँगोतील हत्याकांडात ४४ जण ठार 

- ‘आयएस’संलग्न संघटनेवर संशय

बेनी – आफ्रिकेतील ‘डीआर काँगो’च्या मुकोंदी गावावर झालेल्या दहशतवाद्यांनी घडविलेल्या हत्याकांडात ४४ जणांचा बळी गेला. यातील काही जणांची निर्घृणरित्या हत्या झाल्याची माहिती या देशाच्या लष्कराने दिली. गावातील काही नागरिक बेपत्ता असून त्यांचाही या हल्ल्यात बळी गेल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ‘आयएस’शी संलग्न असलेल्या ‘अलायड् डेमोक्रॅटिक फोर्सेस-एडीएफ’ ही दहशतवादी संघटना यामागे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एडीएफचे डीआर काँगोतील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाने इशारा दिला आहे.

डीआर काँगोतील हत्याकांडात ४४ जण ठार - ‘आयएस’संलग्न संघटनेवर संशयडीआर काँगो-डीआरसी’च्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी नॉर्थ किवू प्रांतातील मुकोंदी गावात भीषण दहशतवादी हल्ला झाला. जवळपास दहा तास सुरू असलेल्या या हल्ल्यामध्ये एडीएफच्या दहशतवाद्यांनी गावातील स्थानिकांना पकडून त्यांची हत्या केली. या हत्याकांडात किमान ४४ जणांचा बळी गेला. बळींमध्ये महिला, मुले आणि वृद्धांचा समावेश होता. एडीएफच्या दहशतवाद्यांनी या हल्ल्यासाठी बंदूकीचा वापर केला नाही. तर धारदार हत्यारांनी गावकऱ्यांची हत्या घडविली, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दहशतवादी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी काही गावकऱ्यांना घरांमध्ये डांबून त्यांची घरे पेटवून दिली. काही वर्षांपूर्वी आयएसच्या दहशतवाद्यांनी सिरिया, इराकमध्ये आयएसने निष्पाप गावकऱ्यांची हत्या घडविण्यासाठी त्यांची घरे पेटवून दिलीहोती. तसाच प्रयोग एडीएफने मुकोंदीतील गावकऱ्यांवर केल्याचा दावा केला जातो. काही गावकरी अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. मुकोंदी गाव गेली काही वर्षे डीआरसीच्या लष्कराच्या नियंत्रणाखाली होते. या गावात व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पण एडीएफच्या हल्ल्यांनी मुकोंदी गावात दहशत माजविल्याचे स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे.

आयएसशी संलग्न असलेल्या ‘एडीएफ’चे दहशतवादी डीआरसीमधील गावांवर हल्ले चढविण्यासाठी बंदूकीचा वापर न करता सर्रास धारदार शस्त्रांचा वापर करतात. डीआर काँगोतील हत्याकांडात ४४ जण ठार - ‘आयएस’संलग्न संघटनेवर संशययामुळे डीआरसी तसेच युगांच्या सीमेवरील गावांमध्ये या संघटनेची अतिशय दहशत निर्माण झाली आहे. डीआरसीच्या लष्कराने एडीएफची दहशत मोडून काढण्यासाठी लष्करी मोहिमा आखल्या होत्या. पण आत्तापर्यंत डीआरसीच्या लष्कराला यामध्ये यश मिळालेले नाही.

आफ्रिकेतील इतर देशांप्रमाणे ‘डीआरसी’मध्ये देखील सत्तेसाठी संघर्ष पेटला आहे. गेल्या काही दशकांपासून डीआरसीमधील १२० हून अधिक सशस्त्र संघटना सत्ता, प्रभाव तसेच येथील नैसर्गिक खनिजसंपत्तीसाठी संघर्ष घडवित आहेत. यामध्ये एडीएफ या ‘आयएस’शी संलग्न दहशतवादी संघटनेची डीआरसीमधील दहशत सर्वाधिक प्रमाणात असल्याचे सांगितले जाते.

या संघटनेची दहशत डीआरसीबरोबरच शेजारी देश युगांडामध्येही पसरलेली आहे. २०१३ साली एडीएफने डीआरसीमध्ये केलेल्या हल्ल्यांमध्ये ६००० हून अधिक जणांचा बळी गेला होता. डीआरसीमधील नॉर्थ किवू आणि इतूरी या प्रांतांवर एडीएफ वर्चस्व मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. या दोन्ही प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणात खनिजसंपत्ती असल्याचा दावा केला जातो.

हिंदी English

 

leave a reply