नायजेरियातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये ४५ जणांचा बळी

- अमेरिकी दूतावासाच्या पथकाला लक्ष्य केले

अबुजा/वॉशिंग्टन – नायजेरियाच्या मध्य तसेच दक्षिणेतील प्रांतांमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये ४५ जणांचा बळी गेला. दक्षिण नायजेरियातील अनाम्ब्रा प्रांतात अमेरिकी दूतावासाच्या पथकाला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात तीनजणांचे अपहरण करण्यात आल्याचेही वृत्त आहे. तर प्लॅटू प्रांतात ‘आयएस’ व ‘बोको हराम’ या दहशतवादी संघटनांशी संलग्न असलेल्या फुलानी वंशियाच्या गटाने गावकऱ्यांवर हल्ला केल्याचे समोर आले.

नायजेरियातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये ४५ जणांचा बळी - अमेरिकी दूतावासाच्या पथकाला लक्ष्य केलेमंगळवारी पहाटे मध्य नायजेरियातील प्लॅटू प्रांताचा भाग असलेल्या फुंगजाई व कुब्वत या गावांवर दहशतवादी हल्ला झाला. अंधाराचा फायदा घेऊन फुलानी दहशतवाद्यांनी शेतात कामासाठी आलेल्या गावकऱ्यांवर भीषण हल्ला चढविला. आतापर्यंत जवळपास ४१ जणांचे मृतदेह हाती लागले असून अनेक जण गंभीर जखमी असल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. या हल्ल्यानंतर प्लॅटू प्रांतात दक्षतेचा इशारा देण्यात आला असून लष्कर व स्थानिक सुरक्षायंत्रणांनी व्यापक शोधमोहीम हाती घेतली आहे.

मध्य नायजेरियातील या हल्ल्यापाठोपाठ दक्षिण नायजेरियाच्या अनाम्ब्रा प्रांतातील अतानी शहरात अमेरिकी दूतावासाच्या पथकावर दहशतवादी हल्ला झाला. नायजेरियातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये ४५ जणांचा बळी - अमेरिकी दूतावासाच्या पथकाला लक्ष्य केलेहल्ल्यात दूतावासाचे दोन कर्मचारी व दोन पोलीस अधिकाऱ्यांचा बळी गेला आहे. हल्लेखोरांनी चालकासह दोन पोलिसांचे अपहरणही केल्याचे उघड झाले. हल्ल्यात अमेरिकी नागरिकांना कोणत्याही प्रकारे हानी पोहोचलेली नसल्याचे ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’चे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी स्पष्ट केले. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानेही स्वतंत्र निवेदन जारी केले असून अमेरिकी यंत्रणा नायजेरियाला पूर्ण सहकार्य करीत असल्याचे सांगितले.

नायजेरियातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये ४५ जणांचा बळी - अमेरिकी दूतावासाच्या पथकाला लक्ष्य केलेनायजेरिया हा आफ्रिकेतील इंधनसंपन्न देशांपैकी एक म्हणून ओळखण्यात येतो. आफ्रिका खंडातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये समावेश होणाऱ्या या देशात नुकत्याच राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकाही पार पडल्या होत्या. गेल्या दशकभरात या देशात हिंसक घटनांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. अल कायदा व ‘आयएस’शी संबंधित दहशतवादी गट, सरकारविरोधी बंडखोर गट, सशस्त्र वांशिक गट तसेच दरोडेखोरांच्या टोळ्यांकडून सातत्याने हल्ले व अपहरणाच्या घटना घडत आहेत. यामुळे नायजेरियात प्रचंड अस्थैर्य असून लष्कर तसेच सुरक्षाव्यवस्था वाढवूनही यात फरक पडलेला नसल्याचे नव्या घटनांवरून दिसून येत आहे.

हिंदी

 

leave a reply