पुण्यात ४७ कोटींच्या बनावट नोटा जप्त

- सहा जणांना अटक

fake-currency-Puneपुणे – पुण्यात बनावट भारतीय आणि विदेशी चलनाचे एक मोठे रॅकेट पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उद्वस्थ केले आहे. पुणे पोलिसांनी तब्बल ४३.४ कोटी रुपयांचे बनावट भारतीय चलन आणि ४.२ कोटी विदेशी चलन पकडले आहे. या कारवाईत एका लष्करी जवनासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी डॉलर्सच्या बदलत्या बनावट नोटा देण्याचे काम करीत होते अशी माहिती समोर आली आहे.

पुण्यातील विमानतळ भागात एका बंगल्यात बनावट नोटांचे रॅकेट चालत असल्याची माहिती पुणे गुन्हे शाखा आणि लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतले. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात दोन हजार, पाचशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. याशिवाय हजार आणि शंभर रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटाही आढळून आल्या. तसेच बनावट अमेरिकन डॉलर्सही जप्त करण्यात आले. छुपे कॅमेरे, दोन बंदूक, कम्‍प्‍युटर, लॅपटॉप, प्रिंटिंग मशीन इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. यात आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असण्याचा संशय व्यक्त केला जातो.

Pune-Fake-Currencyशेख अलीम गुलाब खान, सुनील सारडा, रितेश रत्नाकर, तूफेल अहमद मोहम्मद इशक खान, अब्दुल गनी रहमतुल्ला खान, अब्दुल रहमान अब्दुल गनी खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यात शेख अलीम गुलाब खान हा भारतीय लष्करात जवान आहे.

leave a reply