जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये ‘लश्कर-ए-तोयबा’च्या पाच दहशतवाद्यांना अटक

श्रीनगर – जम्मू- काश्मीरच्या बडगाममध्ये सुरक्षादलाने केलेल्या कारवाईत ‘लश्कर-ए-तोयबा’च्या पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून दहशतवाद्यांचा तळ उद्वस्थ करण्यात आला आहे.

सुरक्षा दलाच्या जवानांना दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाली होती. यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस, ५३ राष्ट्रीय रायफल आणि सीआरपीएफने एक संयुक्त मोहीम राबवून बडगामच्या रिझल गावात केलेल्या कारवाईत झहूर वाणी या ‘लश्कर-ए-तोयबा’च्या दहशतवाद्यांसह पाच जणांना अटक करण्यात आली. युनिस मीर, अस्लम शेख, परवेझ शेख आणि रहमान लोणे अशी अटक करण्यात आलेल्या इतर दहशतवाद्यांची नावे आहेत.

वाणीने त्याच्या घरापासून २०० ते ३०० मीटरवर दहशतवाद्यांना लपण्यासाठी एक तळ बनवला होता. सुरक्षादलाच्या कारवाईत दहशतवाद्यांचा हा तळ उद्वस्त करण्यात यश आले आहे. याठिकाणावरून शस्त्रास्त्रे,स्फोटकांच्या साठ्यासह अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.

वाणी लश्करच्या दहशतवाद्यांना आसरा देण्यासह एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सहाय्य करण्याचे काम करत असे. वाणी ‘लश्कर’चा दहशतवादी युसूफ कांत्रू याचा जवळचा सहकारी असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) अमोद नागपुरे यांनी दिली. या दहशतवाद्यांची चौकशी करण्यात येत असून चौकशीत उघड होणाऱ्या माहितीमुळे दहशतवादी संघटनांचे जाळे उद्वस्थ करण्यात यश मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतो.

leave a reply