अमेरिका-जपानच्या 52 विमानांचा सराव

japan-jetsटोकिओ – ईस्ट चायना सीच्या क्षेत्रात चीनच्या विनाशिका आणि लढाऊ विमानांची घुसखोरी वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत, अमेरिका व जपानच्या हवाईदलाचा संयुक्त सराव पार पडला. यामध्ये दोन्ही देशांच्या 52 लढाऊ विमानांनी सहभागघेतल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या आठवड्यात, 6 जुलै रोजी अमेरिकेच्या 32 तर जपानच्या 20 लढाऊ विमानांनी जपानचा समुद्र, पॅसिफिक समुद्र आणि ईस्ट चायना सीच्या क्षेत्रात मोठा सराव केला. यावेळी सामरिक युद्धकौशल्याचा अभ्यास केल्याचे जपानच्या हवाईदलाने स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वी अमेरिका व जपानच्या नौदलाने सेंकाकू व ओकिनावा बेटांच्या हद्दीत संयुक्त गस्त घातली होती.

leave a reply