इजिप्तच्या सागरी क्षेत्रात इंधनवायूचा साठा सापडला

अमेरिकी व इटलीच्या कंपन्या उत्खनन करणार

stena_forth_egypt_gasकैरो – इजिप्तच्या ‘नर्गिस-1’ या इंधन क्षेत्राजवळच इंधनवायूचा प्रचंड मोठा साठा सापडला आहे. याचे तपशील समोर आलेले नाहीत. पण अमेरिका व इटलीतील इंधन उत्खनन क्षेत्रातील कंपन्या याचे मोजमाप करीत असून याच कंपन्या सदर क्षेत्रात उत्खनन करणार आहेत. या इंधनवायूचा इजिप्तच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल, असा दावा केला जातो.

अमेरिकेची प्रसिद्ध कंपनी ‘शेवरॉन’ आणि इटलीची ‘एनी’ गेल्या काही वर्षांपासून भूमध्य समुद्रातील व इजिप्तच्या हद्दीतील नर्गिस क्षेत्रात इंधनाचे उत्खनन करीत आहेत. सुमारे 1800 चौरस किलोमीटर पसरलेल्या या इंधन क्षेत्रातून उपसल्या जाणाऱ्या 90 टक्के साठ्यावर अमेरिका व इटलीच्या कंपन्यांचा अधिकार आहे. तर इजिप्तच्या थारवा पेट्रोलियम कंपनीकडे फक्त 10 टक्के समभाग आहेत.

इजिप्तकडे 2.21 ट्रिलियन क्युबिक मीटर इतका इंधनवायूचा साठा असल्याचा दावा केला जातो. 2015 साली झोहर येथील सागरी क्षेत्रात 750 अब्ज क्युबिक मीटर इंधनवायूचा साठा सापडल्याची माहितीही समोर आली होती.

हिंदी English

leave a reply