अमेरिकी लष्कराकडून सिरियन इंधनाची लूट

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचा आरोप

us syria oilबीजिंग – गेल्या कित्येक वर्षांपासून लष्करी कारवाईसाठी सिरियात ठाण मांडून बसलेले अमेरिकेचे लष्कर या देशाच्या इंधनाची लूट करीत आहेत. यामुळे सिरियामध्ये सर्वात मोठ्या मानवतावादी संकटाच्या उंबरठ्यावर उभा असल्याचा आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. सिरियन माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीवर चीनने ही प्रतिक्रिया दिली.

सिरियाच्या हसाका प्रांतातून इंधनाने भरलेले 53 टँकर अमेरिकेने इराकमधील आपल्या लष्करी तळासाठी रवाना केल्याची बातमी सिरियन मुखपत्राने प्रसिद्ध केली होती. अमेरिकेच्या लष्कराने यासाठी स्थानिक कुर्द बंडखोरांचे सहाय्य घेतल्याचे सिरियन मुखपत्राने म्हटले होते. याआधीही अमेरिकेने इंधनाने भरलेले 60 टँकर सिरियातून इराकमध्ये पाठविल्याचे आरोप झाले होते.

यावर प्रतिक्रिया देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेंबिन यांनी अमेरिकेची सिरियातील सैन्यतैनाती इंधनाच्या चोरीसाठी असल्याचा ठपका ठेवला. अमेरिकेच्या या लुटीमुळे सिरियामध्ये इंधन तसेच मानवतावादी संकट निर्माण झाल्याचा दावा चीनने केला. सिरियन सरकारच्या आकडेवारीनुसार, अमेरिकी लष्कर प्रतिदिन 80 टक्के इंधनसाठ्याची तस्करी करीत आहेत, याकडे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने लक्ष वेधले.

हिंदी English

leave a reply