’उडान’ योजनेअंतर्गत ७८ नवीन हवाई मार्गांना मंजुरी

नवी दिल्ली – केंद्र सरकारने गुरुवारी ‘उडान'(उडे देश का आम नागरिक) योजनेअंतर्गत ७८ नवीन हवाईमार्गांना मान्यता दिली आहे. या नव्या मार्गांमध्ये ईशान्येकडील राज्ये, डोंगराळ भाग आणि बेटांचा समावेश आहे. लॉकडाऊनमुळे बंद असलेली विमानसेवा टप्प्याटप्प्याने सुरू झाली असताना केंद्र सरकारने या नव्या मार्गांवर ‘उडान’सेवा सुरू करून जनतेला मोठा दिलासा दिला आहे. २०१६ साली केंद्र सरकारने ‘उडान’ योजना सुरू केली होती.

’उडान' योजनेअंतर्गत ७८ नवीन हवाई मार्गांना मंजुरीछोट्या व मध्यम शहरांना हवाईमार्गाने जोडता यावे यासाठी सरकारने ‘उडे देश का आम नागरिक’ अर्थात (उडान)योजना सुरू केली. याअंतर्गत फ्लाईटच्या ५० टक्के सीटचे भाडे जास्तीत जास्त अंतरानुसार सरकारकडून ठरवले जाते. ‘उडान’ अंतर्गत देशातील सर्व विमानतळ आणि हेलिपॅड जोडले जाणार आहेत. या योजनेत दरवर्षी २६.५ लाख सीट उपलब्ध करून दिल्या जाणार असून विमानाचे भाडे प्रति तास २५०० रूपये दरापासून किलोमीटरच्या हिशोबाने आकारले जाते.

’उडान' योजनेअंतर्गत ७८ नवीन हवाई मार्गांना मंजुरी‘उडान’ योजनेच्या पहिल्या तीन टप्प्यांमध्ये ६८८ मार्गांपैकी २७४ मार्गांवर विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी ‘उडान’च्या चौथ्या टप्प्यात ७८ मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये २९ ‘सर्व्हड’, ८ ‘अनसर्व्हड’ आणि २ ‘अंडरसर्व्हड’ विमानतळांची निवड केली आहे. ‘या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ५६, दुसऱ्या टप्प्यात ११८ आणि तिसऱ्या टप्प्यात १०० मार्गांवर उड्डाण सेवा सुरू झाली आहे. नव्या ७८ मार्गांमध्ये, १८ छोट्या शहरांमधील विमानतळ दिल्ली, कोलकाता आणि रांची यासारख्या महानगरांशी जोडले जाणार आहे. या मार्गांमुळे नवीन भागातील पर्यटनाला चालना मिळेल आणि अर्थव्यवस्था मजबूत होईल’, असा विश्वास नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केला आहे.

’उडान' योजनेअंतर्गत ७८ नवीन हवाई मार्गांना मंजुरीमंजुर झालेल्या नवीन मार्गांमध्ये देशाचा सीमाभाग व डोंगराळ भागाशी संपर्क वाढविण्यासाठी मार्ग सुरू करण्यात आले आहेत. त्याचा मुख्यत: ईशान्य भारत, डोंगराळ भाग आणि बेटांवर राहणाऱ्या जनतेला फायदा होईल. या माध्यमातून त्यांना ‘फ्लाइट कनेक्टिव्हिटी’ मिळणार आहे.

उडानच्या चौथ्या टप्प्यात गुवाहाटी ते तेजू, रूसी, तेजपूर, पसिघाट, मिसा आणि शिलॉंग या ठिकाणांचा समावेश आहे. तर दिल्ली-बरेली, बिलासपूर-भोपाळ, कानपूर-मुरादाबाद, अलीगड-चित्रकुट, चित्रकुट-प्रयागराज, श्रावस्ती-कानपूर मार्गही सुरू करण्यात आला आहे. याशिवाय चंदीगडहून हिसार, डेहराडून व धर्मशाला या मार्गांनाही मान्यता मिळाली आहे. तसेच लक्षद्वीपच्या काही भागांनाही या योजनेच्या माध्यमातून जोडण्यात आले आहे. २०१६ साली या योजनेला सुरूवात झाल्यानंतर आतापर्यंत ७६६ नव्या मार्गांवर विमान सेवा सुरू करण्यात आली आहे.

leave a reply