लष्करात महिलांच्या ‘पर्मनंट कमिशन’ला मंजुरी

Permanent-Commissionनवी दिल्ली – गुरुवारी संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करात महिलांच्या ‘पर्मनंट कमिशन’ला मंजुरी दिली. या संर्दभात केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली असून यानुसार महिलांना लष्कराच्या दहा विभागात पर्मनंट कमिशन’वर काम करता येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून लष्करात महिलांच्या ‘पर्मनंट कमिशन’ची मागणी होत होती. काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने लष्करात महिलांच्या ‘पर्मनंट कमिशन’संदर्भांत एका याचिकेवर सुनावणीदरम्यान आदेश दिले होते. यापार्श्वभूमीवर गुरुवारी संरक्षणमंत्रालयाने लष्करात महिलांच्या ‘पर्मनंट कमिशन’ला मंजुरी दिली आणि या संदर्भांत अधिसूचना काढली.

यानुसार लष्कराच्या ‘आर्मी एअर डिफेन्स’, ‘सिग्नल्स’, ‘इंजिनिअर्स’, ‘आर्मी एव्हिशेन’, ‘इलेक्ट्रॉनिक्स अँन्ड मेकॉनिकल इंजिनिअर्स’,’आर्मी सर्व्हिस कॉर्प्स’, ‘आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स, ‘इंटेलिजन्स कॉर्प्स’ मधील ‘अॅडव्होकेट जनरल’, ‘आर्मी एज्युकेशन कॉर्प्स’ या विभागांमध्ये महिलांना पर्मनंट कमिशन मिळू शकते. दरम्यान, देशाच्या संरक्षणदलामध्ये महिलांचा सहभाग कमी आहे. संरक्षणदलाचे वैद्यकीय क्षेत्र सोडल्यास भारतीय लष्करामध्ये महिलांंचा ३.८९ टक्के, नौदलात ६.७ टक्के आणि वायुसेनेमध्ये १२.३८ टक्के इतका सहभाग आहे.

leave a reply