इराणच्या अणुकराराचे काहीही झाले तरी इस्रायलवरील हल्ले थांबणार नाहीत

- हिजबुल्लाह प्रमुखाची घोषणा

इस्रायलवरील हल्लेबैरूत – इराणने अणुकराराच्या आड येणारी ‘रेड लाईन’ काढून टाकल्यामुळे अमेरिकेबरोबरचा अणुकरार शक्यतेच्या टप्प्यात आल्याचे दावे केले जात आहेत. पण हा अणुकरार झाला किंवा झाला नाही, तरी देखील हिजबुल्लाहचे इस्रायलवरील हल्ले थांबणार नाहीत, अशी धमकी हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाने दिली.

अमेरिका व इराण यांच्यातील अणुकरार अगदी दृष्टीपथात असल्याचे दावे अमेरिका व युरोपमधील माध्यमे करीत आहेत. यावर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीच्या प्रतिनिधींची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर अमेरिका व युरोपिय महासंघ इराणबरोबर अणुकरारावर आणखी एकदा चर्चा करतील. इराणच्या अणुकार्यक्रमापासून आपल्या अस्तित्त्वालाच धोका असल्याचे इस्रायल सांगत आहे. मात्र इराणबरोबर अणुकरार झाला, तर अमेरिका इस्रायलच्या सुरक्षेची हमी घेईल, असा दावा इस्रायलमधील काही विश्लेषकांनी केला होता.

पण अणुकराराच्या भवितव्याचा इस्रायलच्या सुरक्षेशी काडीचाही संबंध नसल्याचे संकेत इराणचे पाठबळ लाभलेल्या लेबेनॉनमधील हिजबुल्लाह या संघटनेने दिले आहेत. पाश्चिमात्य देशांनी इराणबरोबर अणुकरार केला तरी पुढच्या काळात इराण इस्रायलवरील हल्ल्यापासून हिजबुल्लाहला रोखणार नाही, असे नसरल्लाने जाहीर केले. त्यामुळे अणुकरारानंतरही इराण थेट किंवा अप्र्रत्यक्षपणे इस्रायलच्या सुरक्षेला आव्हान देत राहिल, ही इस्रायल व्यक्त करीत असलेली चिंता प्रत्यक्षात उतरत असल्याचे दिसत आहे. यामुळे अणुकरारासाठी इराणशी वाटाघाटी करणाऱ्या अमेरिका व इतर पाश्चिमात्य देशांवरील दडपण वाढू शकेल.

leave a reply