इराणवर हल्ल्यासाठी ‘बोईंग’चा इस्रायलला ‘एफ-१५’चा प्रस्ताव

जेरूसलेम – अमेरिकेची आघाडीची विमाननिर्मिती कंपनी ‘बोईंग’चे प्रमुख टेड कोलर्ब्ट यांनी इस्रायलचा दौरा करून पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांची भेट घेतली. या भेटीत बोईंगच्या प्रमुखांनी इस्रायलला एफ-१५आयए प्रगत लढाऊ विमान आणि केसी-४६ इंधनवाहू टँकर्सच्या खरेदीचा प्रस्ताव दिला. इस्रायलच्या आगामी हवाई कारवाईसाठी आपली ही विमाने सहाय्यक ठरतील, असे कोलर्ब्ट यांनी म्हटले आहे. थेट उल्लेख न करता बोईंगच्या प्रमुखांनी इस्रायलला इराणविरोधी कारवाईसाठी विमानखरेदीचा हा प्रस्ताव दिल्याचे उघड आहे.

boeing colbert israel netanyahu F15इस्रायलने केलेल्या करारानुसार बोईंग येत्या काही महिन्यांमध्ये इस्रायलच्या हवाईदलाला २५ ‘एफ-१५आयए’ लढाऊ विमाने पुरविणार आहे. पण गेल्याच महिन्यात इस्रायलने अमेरिकेकडे अतिरिक्त विमानांच्या खरेदीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर बोईंगच्या प्रमुखांनी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू व संरक्षणमंत्री गॅलंट यांची भेट घेतली. यावेळी इस्रायलला अतिरिक्त २५ एफ-१५आयए पुरविण्याचा प्रस्ताव बोईंगच्या प्रमुखांनी दिला. खास इस्रायलसाठी तयार केलेल्या या विमानांमध्ये अधिक संख्येने क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षचमता आहे. सात हजार पौंड वजनाचे हायपरसोनिक क्षेपणास्त्र देखील या विमानातून वाहून नेता येते.

या विमानांची अतिरिक्त खरेदी इस्रायल इराणचा धोका लक्षात ठेवून करीत असल्याचा दावा केला जातो. त्याचबरोबर इराणपर्यंत उड्डाण करणाऱ्या विमानांना परतीच्या वाटेवर इंधन पुरविण्यासाठी केसी-४६ या इंधनवाहू टँकर्सची खरेदी सुरू असल्याचे दिसत आहे.

leave a reply