रशियाच्या ‘अंडरवॉटर ड्रोन’कडून युक्रेनमधील पूल उद्ध्वस्त

russia underwater drone attackमॉस्को – रशियाने ‘अंडरवॉटर ड्रोन’च्या सहाय्याने युक्रेन व मोल्दोव्हाला जोडणारा पूल उडवून दिल्याचे समोर आले आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ इंटरनेटवर प्रसिद्ध झाला असून त्यात एक मानवरहित बोटीप्रमाणे दिसणारी वस्तू पाण्यातून वेगाने जाताना दाखविण्यात आली आहे. पुलाच्या जवळ आल्यावर त्याचा स्फोट होऊन पुलाची मोठी हानी झाल्याचे दिसत आहे.

युक्रेनच्या दक्षिण भागातील ओडेसा प्रांत व मोल्दोव्हाला जोडणाऱ्या ‘झॅटोका ब्रिज’जवळ ही घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे. रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर या पुलाचा वापर करून रोमानिया, बल्गेरिया यासारख्या देशांनी युक्रेनला शस्त्रपुरवठा सुरू केला होता. त्यामुळे रशियाने अनेकदा या पुलाला लक्ष्य केले होते. मात्र तो उद्ध्वस्त करण्यात यश आले नव्हते.

मात्र नव्या व्हिडिओत रशियाने ‘अंडरवॉटर ड्रोन’चा वापर करून पूल उडवून दिल्याचे दिसत आहे. रशियाने युद्धात पहिल्यांदाच अंडरवॉटर ड्रोनचा वापर केल्याचे सांगण्यात येते. काही विश्लेषकांनी हे ड्रोन नसून ‘अनक्रूड सरफेस व्हेसल’ असल्याचा दावा केला आहे.

हिंदी English

leave a reply