रशिया-युक्रेन युद्धात तटस्थ राहिलेल्या ऑस्ट्रियावर पाश्चिमात्य देशांचा दबाव

Russia-Ukraine warव्हिएन्ना – रशिया-युक्रेन युद्धात लष्करी पातळीवर तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेल्या ऑस्ट्रियावर पाश्चिमात्य देशांनी दडपण आणण्यास सुरुवात केली आहे. पुढील आठवड्याच्या अखेरीस ऑस्ट्रियात ‘ओएससीई’ या गटाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी ऑस्ट्रियाने रशियाच्या 15 नेते व अधिकाऱ्यांना व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला 20 देशांच्या प्रतिनिधींनी विरोध दर्शविला आहे.

रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर युरोपिय देशांनी रशियाविरोधात मोठ्या प्रमाणात निर्बंध टाकले होते. युरोपिय देशांकडून युक्रेनला प्रचंड अर्थ तसेच शस्त्रसहाय्य करण्यात येत आहे. मात्र हंगेरी, सर्बिया व ऑस्ट्रिया यासारख्या देशांनी रशियाविरोधात टोकाचे धोरण स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य देशांकडून या देशांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

पुढील आठवड्यात रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याचवेळी ‘ओएससीई’ची बैठकही होत आहे. याचे निमित्त करून पाश्चिमात्य देशांनी ऑस्ट्रियाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. मात्र ऑस्ट्रिया सरकारने अद्याप त्याला दाद दिलेली नाही.

हिंदी English

leave a reply