अमेरिकेच्या शिकागोमध्ये 1990 सालानंतर सर्वाधिक हिंसक गुन्ह्यांची नोंद

शिकागो – अमेरिकेत सर्वाधिक लोकसंख्या असणारे तिसरे शहर म्हणून ओळख असणाऱ्या शिकागोमध्ये हिंसक गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. 2021 साली शिकागोमध्ये सुमारे 800 हत्या व साडेतीन हजारांहून अधिक गोळीबाराच्या गुन्ह्यांची नोंद झाली. शिकागोमध्ये गेल्या 25 वर्षात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसक प्रकरणांची नोंद झाली आहे. शिकागोच्या मेयर डेमोक्रॅट पक्षाच्या असून त्यांनी 2020 साली सुरक्षाखर्चात तब्बल 1.8 अब्ज डॉलर्सची कपात केली होती.

हिंसक गुन्ह्यांची नोंदशिकागोच्या पोलीस विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, 2021 साली शहरात 797 जणांच्या हत्या करण्यात आल्या. 2021 साली अमेरिकेतील शहरांमध्ये झालेल्या हत्येच्या घटनांमध्ये सर्वाधिक घटना शिकागोमध्ये झाल्या आहेत. 2020च्या तुलनेत यात 25 तर 2019 सालच्या तुलनेत या घटनांमध्ये सुमारे 300 घटनांची भर पडली आहे. गन शूटिंगच्या 3,561 प्रकरणांची नोंद झाली असून 2019 सालच्या तुलनेत तब्बल 1,415 प्रकरणे वाढली आहेत. यातील 75 प्रकरणांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले होते.

शिकागोतील या वाढत्या हिंसाचारामागे स्थानिक प्रशासनाची अकार्यक्षमता कारणीभूत हिंसक गुन्ह्यांची नोंदअसल्याची टीका करण्यात येत आहे. डेमोक्रॅट पक्षाच्या मेयर लोरी लाइटफूट यांनी 2020 साली पोलिसिंग बजेटमध्ये अर्थात पोलीस दलावरील खर्चात 1.8 अब्ज डॉलर्सची कपात केली होती. त्यामुळे शिकागोतील सक्रिय पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणात कपात झाली. 2020 साली शिकागोतील एक हजारांहून अधिक पोलीस निवृत्त झाल्यानंतर पोलीसदलातील 600 पदे कायमची रद्द करण्यात आली होती. शहरात ‘डिफंड द पोलिस` मोहिमेअंतर्गत मोठी निदर्शनेही झाली होती.

याचे परिणाम शिकागोतील गुन्हेगारीवर दिसून येत आहेत. शहरात गस्त घालण्यासह इतर महत्त्वाच्या कामांसाठी पोलीस कमी पडत असल्याने टोळीयुद्ध व इतर हिंसक घटनांचे प्रमाण वाढल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वी शिकागो पोलिसदलात ‘911 डिस्पॅचर` म्हणून काम करणाऱ्या केथ थॉर्नटन यांनी मेयर लाइटफूट यांच्या धोरणांवर टीकास्त्र सोडून त्यांनी शिकागोला ‘डेथ झोन` बनविल्याचा गंभीर आरोप केला होता.

leave a reply