‘साऊथ चायना सी’ क्षेत्रात चीनच्या विमानवाहू युद्धनौकेचा सराव

विमानवाहूबीजिंग – ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’ने साऊथ चायना सी क्षेत्रात सराव सुरू केला आहे. यामध्ये चिनी बनावटीची ‘शँदाँग’ विमानवाहू युद्धनौकेसह विनाशिकांचाही समावेश आहे. या सरावाद्वारे सदर सागरी क्षेत्रावरील आपला दावा ठोकण्यासाठी चीन प्रयत्न करीत असल्याचा दावा विश्लेषक करीत आहेत.

चीनच्या नौदलातील ‘वरयाग’ ही पहिली विमानवाहू युद्धनौका मोठ्या सागरी सफरीसाठी किंवा लष्करी मोहिमांसाठी उपयुक्त नसल्याचे आंतरराष्ट्रीय लष्करी विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यामुळे चीनने तातडीने ‘शँदाँग’ या विमानवाहू युद्धनौकेची निर्मिती करून त्याची चाचणी सुरू केली आहे. साऊथ चायना सीमधील सराव देखील त्याचाच एक भाग असल्याचा दावा केला जातो. या सरावात शँदाँग युद्धनौकेवरुन चीनची ‘जे-१५’ लढाऊ विमाने उड्डाणे करतील. त्याचबरोबर इतर सागरी मोहिमांसाठी ही युद्धनौका सज्ज आहे का, याची चाचणी घेतली जाणार आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौका आणि विनाशिकांनी साऊथ चायना सी क्षेत्रात गस्त घातली होती. तर अमेरिकेचे वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांनी फिलिपाईन्सला भेटही दिली होती. फिलिपाईन्सने देखील अमेरिकेबरोबरचे संरक्षण सहकार्य वाढविण्याचे जाहीर केले होते.

leave a reply