कोरोनामुळे चीनची आर्थिक राजधानी शांघायमध्ये लॉकडाऊनची घोषणा

-इंधनाचे दर पाच टक्क्यांनी घसरले

शांघायमध्ये लॉकडाऊनची घोषणाबीजिंग/लंडन – जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर व चीनच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखण्यात येणार्‍या शांघायमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. सुमारे अडीच कोटी लोकसंख्येच्या या शहरात दोन टप्प्यांमध्ये लॉकडाऊन लागू होणार असून तो ५ एप्रिलपर्यंत असेल, असे स्थानिक यंत्रणांनी जाहीर केले. चीनमध्ये कोरोनाच्या साथीची सुरुवात झाल्यापासून शांघायमध्ये पूर्ण लॉकडाऊन लागू होण्याची ही पहिलीच वेळ ठरते. याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले असून कच्च्या तेलाच्या दरांमध्ये पाच टक्क्यांची घसरण झाली आहे. अमेरिका तसेच युरोपिय शेअरबाजारांमध्येही घसरणीला सुरुवात झाल्याचे वृत्त आहे.

चीनधील शांघाय हे शहर देशाच्या अर्थकारणाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखण्यात येते. चीनमधील सर्वात मोठे ‘विशेष आर्थिक क्षेत्र’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या या शहराचा जीडीपी १.३ ट्रिलियन डॉलर्स इतका शांघायमध्ये लॉकडाऊनची घोषणाआहे. वित्त, गुंतवणूक, उत्पादन, पर्यटन, विज्ञान व तंत्रज्ञान आणि वाहतूक या क्षेत्रात हे चीनमधील आघाडीचे शहर आहे. जगातील सर्वाधिक गर्दीचे बंदर व विमानतळ असणार्‍या या शहरात सर्वात मोठे मेट्रो सेवेचे नेटवर्कही आहे. २०१९ साली चीनमध्ये कोरोनाच्या साथीला सुरुवात झाल्यापासून शांघाय पूर्ण लॉकडाऊन करण्याची वेळ कधीच ओढवली नव्हती. गेल्या आठवड्यापर्यंत चीनमधील यंत्रणाही शांघायमध्ये लॉकडाऊन लागू होणार नसल्याचे संकेत देत होत्या.

मात्र गेल्या काही दिवसांपासून शांघायमधील कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होण्यास सुुरुवात झाली होती. शनिवारी सुमारे अडीच हजार तर रविवारी तीन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. कोरोना साथीच्या काळात शांघायमध्ये सलग इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ होती. शांघायमध्ये लॉकडाऊनची घोषणाया पार्श्‍वभूमीवर चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने रविवारी संध्याकाळी शांघायमध्ये लॉकडाऊन लादण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर काही तासांच्या अवधीत शांघायमधील सुपरमार्केट्समध्ये मोठी गर्दी झाल्याचे तसेच काही ठिकाणी झटापटी झाल्याचेही समोर आले आहे.

आर्थिक केंद्र असलेल्या शहरात कठोर लॉकडाऊन लागू केल्याच्या घोषणेचे पडसाद आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत उमटले आहेत. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाचे दर तब्बल पाच टक्क्यांनी घसरले. लंडनमध्ये झालेल्या व्यवहारांमध्ये ११२ डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत खाली आले. तर शांघायमध्ये लॉकडाऊनची घोषणाअमेरिकेतील ‘डब्ल्यूटीआय क्रूड’चे दर प्रति बॅरल १०८ डॉलर्सपर्यंत खाली आले आहेत. अमेरिका व युरोपिय शेअरबाजारांमध्येही घसरण सुरू झाल्याचे वृत्त आहे. शांघायमधील लॉकडाऊनमुळे जागतिक पुरवठा साखळी पुन्हा विस्कळीत होण्याची शक्यता असून चीनसह आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेलाही त्याचे धक्के बसतील, असे विश्‍लेषकांनी बजावले आहे.

दरम्यान, चीनपाठोपाठ अमेरिका, ब्रिटन तसेच काही युरोपिय देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे समोर आले आहे. जर्मनी व इटलीत दररोज आढळणार्‍या रुग्णांची संख्या लाखांवर पोहोचली आहे. तर ब्रिटनमध्ये गेल्या आठवड्यात ४२ लाख रुग्णांची नोंद झाली आहे. अमेरिकेत दररोज सरासरी २८ हजार रुग्ण आढळत असल्याची माहिती स्थानिक आरोग्य यंत्रणांनी दिली आहे.

leave a reply