चीन तैवानची कोंडी करू शकणार नाही

- अमेरिकन संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांचा इशारा

तैवानची कोंडीटोकिओ – तैवानच्या क्षेत्रानजिक चीनने सुरू केलेले युद्धसराव चिथावणीखोर असून या बेजबाबदारपणाचेे परिणाम तैवानचे आखात व या संपूर्ण क्षेत्रातील शांतता आणि स्थैर्यावर होत आहेत, अशी टीका अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी केली आहे. तर अमेरिकेच्या नेत्यांना तैवानला भेट देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणारा चीन अशारितीने तैवानची कोंडी करू शकत नाही, असे अमेरिकी संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी बजावले आहे. जपानच्या भेटीवर असलेल्या पेलोसी चीनला हा इशारा देत असतानाच, जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी चीनच्या तैवानविरोधी कारवाया म्हणजे ‘गंभीर समस्या’ बनल्याचा ठपका ठेवला आहे. त्याचवेळी जपानच्या सागरी हद्दीचा भाग असलेल्या ‘एक्सक्ल्यूझ्ािव्ह इकॉनॉमिक झ्ाोन-ईईझ्ोड’मध्ये कोसळलेल्या चीनच्या क्षेपणास्त्रांचा जपानच्या पंतप्रधानांनी जळजळीत शब्दात निषेध नोंदविला आहे.

नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिल्यानंतर चीनने तैवानजवळील क्षेत्रात सहा ठिकाणी लष्करी सराव सुरू केला असून तैवानच्या सुरक्षेला थेट आव्हान देणाऱ्या लष्करी कारवाया चीनने सुरू केल्या आहेत. चीनच्या या प्रक्षोभक व बेजबाबदार कारवायांचे तैवानची खाडी व या क्षेत्रातील शांतता आणि स्थैर्य यावर विपरित परिणाम होतील, अशी चिंता अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी व्यक्त केली. पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे अमेरिकेच्या चीनविषयक भूमिकेत बदल झ्ााला, असा दावा कुणालाही करता नाही. पण चीन मात्र पेलोसी यांच्या भेटीचे कारण पुढे करून तैवानच्या आखातातील आपल्या प्रक्षोभक लष्करी कारवाया वाढवित आहे, अशी टीका अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली. तर अमेरिकन ‘नॅशलन सिक्युरिटी काऊन्सिल’च्या ‘कोऑर्डिनेटर फॉर स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्स’ पदावर असलेले जॉन किरबाय यांनीही चीनच्या या कारवायांचा निषेध केला.

दरम्यान, चीनच्या कारवायांमुळे तैवानच्या आखातात तणाव निर्माण झ्ाालेला असताना, अमेरिकेने ‘मिनिटमन थ्री’ या आंतरखंडीय बॅलेस्टीक क्षेपणास्त्राची चाचणी काही काळासाठी पुढे ढकलली आहे. या आठवड्यातच त्याची चाचणी केली जाणार होती. पण चीनच्या कारवायांमुळे निर्माण झ्ाालेल्या तणावात भर पडू नये, यासाठी ही चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती किरबाय यांनी दिली आहे.

तैवान व दक्षिण कोरियानंतर, जपानच्या भेटीवर असलेल्या नॅन्सी पेलोसी यांनी चीनच्या चिथावणीखोर कारवायांचा चांगलाच समाचार घेतला. चीन तैवानचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील समावेश रोखू शकतो. पण अमेरिकन नेत्यांची तैवान भेट रोखून आपण तैवानला एकटे पाडू, या भ्रमात चीनने राहता कामा नये, असा संदेश पेलोसी यांनी दिला आहे. इतकेच नाही तर चीनमध्ये होणाऱ्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा मुद्दाही पेलोसी यांनी उपस्थित केला. व्यापारी हितसंबंधांसाठी जर आपण चीन करीत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाकडे दुर्लक्ष केले, तर जगात कुठेही होणाऱ्या मानवाधिकारांच्या उल्लंघनावर बोलण्याचा नैतिक अधिकार आपण गमावलेला असेल, याची जाणीव पेलोसी यांनी करून दिली. चीन उघूरवंशियांवर करीत असलेल्या भयंकर अत्याचारांवर पेलोसी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. याबरोबरच अमेरिकेची तैवानबरोबरील मैत्री भक्कम असून याबाबत अमेरिकेचे सत्ताधारी व विरोधी पक्षामध्ये पूर्ण एकमत आहे, असे पेलोसी म्हणाल्या.

चीनने डागलेली पाच क्षेपणास्त्रे जपानच्या ईईझ्ोडमध्ये कोसळली होती. जपानी नागरिकांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या चीनच्या या चाचण्यांचा जपान जळजळीत शब्दात निषेध करीत असल्याचे जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी म्हटले आहे. तर जपानचे परराष्ट्रमंत्री योशिमासा हयाशी यांनी चीनच्या कारवायांमुळे क्षेत्रातील स्थैर्य व शांतता धोक्यात आल्याचा ठपका ठेवून चीनने त्वरित या क्षेत्रातील युद्धसराव बंद करावा, अशी मागणी केली.

leave a reply