चीनकडून तैवानवर हवाई हल्ल्याचा सराव

- ४८ तासात १५० हून अधिक चिनी विमानांची तैवानजवळ गस्त

बीजिंग/तैपेई – तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांच्या अमेरिका भेटीमुळे खवळलेल्या चीनने सलग तिसऱ्या दिवशी तैवानला धमकावणारा सराव केला. गेल्या ४८ तासात चीनच्या विमानवाहू युद्धनौकेसह २० विनाशिका आणि दीडशेहून अधिक लढाऊ विमानांनी तैवानची ‘मीडियन लाईन’ ओलांडून हवाई हल्ल्याचा सराव केला. प्रत्युत्तरादाखल तैवानने देखील लढाऊ विमाने, गस्ती नौका रवाना केल्या आणि आवश्यकता पडल्यास चीनवर कारवाई करण्याचे आदेशही आपल्या संरक्षणदलांना दिले आहेत. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी तैवानच्या आखातातील तणाव कायम आहे.

चीनकडून तैवानवर हवाई हल्ल्याचा सराव - ४८ तासात १५० हून अधिक चिनी विमानांची तैवानजवळ गस्तचीनने सुरू केलेल्या ‘युनायटेड शार्प स्वर्ड’ या सरावाअंतर्गत रविवारी चीनच्या ‘शँदाँग’ विमानवाहू युद्धनौकेसह आठ विनाशिकांनी तैवानला घेरले होते. त्याचबरोबर ७१ लढाऊ आणि बॉम्बर विमानांनी चीन-तैवानला विभागणारी ‘मीडियन लाईन’ ओलांडून तैवानच्या हद्दीत गस्त सुरू केली होती. चीनची ही कारवाई आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणारी असल्याची टीका तैवानने केली. साधारण सव्वा तास चीनची विमाने आपल्या हद्दीत असल्याचा आरोप तैवानने केला. तैवानने आपली हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करून प्रत्युत्तराची तयारी केल्यानंतर चीनच्या विमानांनी माघार घेतली होती. सोमवारी सकाळी पुन्हा एकदा चीनच्या ११ विनाशिका आणि ५९ लढाऊ विमानांनी पुन्हा एकदा तैवानच्या हद्दीत प्रवेश करुन हल्ल्यांचा सराव केला.

चीनकडून तैवानवर हवाई हल्ल्याचा सराव - ४८ तासात १५० हून अधिक चिनी विमानांची तैवानजवळ गस्त‘‘‘पिपल्स लिबरेशन आर्मी’चा हा युद्धसराव म्हणजे ‘स्वतंत्र तैवान’साठी प्रयत्न करणारे विघटनवादी गट आणि त्यांना समर्थन देणाऱ्या परदेशी शक्तींसाठी इशारा आहे’’, अशी धमकी चीनच्या ईस्टर्न थिअटर कमांडचे प्रवक्ते कर्नल शी ई यांनी दिली. गेल्या आठवड्यात तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी ग्वातेमाला आणि बेलीझ या लॅटीन अमेरिकी देशांच्या दौऱ्यानंतर मायदेशी परतण्याआधी अमेरिकेचा दौरा केला. यावेळी अमेरिकन प्रतिनिधीगृहाचे सभापती केविन मॅकार्थी यांनी तैवानच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली.चीनकडून तैवानवर हवाई हल्ल्याचा सराव - ४८ तासात १५० हून अधिक चिनी विमानांची तैवानजवळ गस्त

तैवान हा आपला सार्वभौम भूभाग असून इतर कोणत्याही देशाने तैवानबरोबर राजकीय किंवा लष्करी सहकार्य प्रस्थापित करू नये, असे चीनने दटावले आहे. अमेरिकेने ‘वन चायना पॉलिसी’चे उल्लंघन करुन तैवानच्या राष्ट्राध्यक्षांना जवळ केले तर त्याचे गंभीर परिणाम होतील, अशी धमकी चीनने दिली होती. राष्ट्राध्यक्षा इंग-वेन यांचा दौरा आयोजित करणाऱ्या अमेरिकेच्या दोन संघटनांवर चीनने निर्बंध टाकले आहेत. सलग तीन दिवस तैवानला घेरणारा युद्धसराव आयोजित करून चीनने तैवानसह अमेरिकेलाही धमकावले आहे.

दरम्यान, बायडेन प्रशासनाने चीनच्या या युद्धसरावाविरोधात कठोर भूमिका न स्वीकारून तैवानची सुरक्षा धोक्यात टाकल्याची टीका अमेरिकेतूनच केली जात आहे.

हिंदी

 

leave a reply