चीनच्या ‘हायपरसोनिक मिसाईल टेस्ट’मुळे अण्वस्त्रस्पर्धा भडकेल

- अमेरिकी सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांचा इशारा

वॉशिंग्टन/बीजिंग – चीनने आण्विक क्षमता असलेल्या हायपसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी करणे ही फारशी चांगली बातमी नाही आणि ही बातमी जर खरी असेल, तर त्यामुळे अमेरिका व चीनमध्ये अण्वस्त्रस्पर्धा भडकण्याची शक्यता आहे, असा गंभीर इशारा अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी दिला. ग्रॅहम यांनी अमेरिकी संसदेला उद्देशून एक पत्र लिहिले असून त्यात संरक्षण विभाग व गुप्तचर यंत्रणांबरोबर तातडीने एक बैठक आयोजित करावी, अशी मागणीही केली आहे. चीनने सलग दोन महिन्यात आण्विक क्षमता असलेल्या दोन हायपरसोनिक क्षेपणास्त्रांची चाचणी केल्याचे ब्रिटीश दैनिकाने दिलेल्या वृत्तातून समोर आले आहे.

चीनच्या ‘हायपरसोनिक मिसाईल टेस्ट’मुळे अण्वस्त्रस्पर्धा भडकेल - अमेरिकी सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांचा इशाराचीनने आण्विक क्षमता असलेल्या हायपसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी करणे चांगली बातमी नाही व ही बातमी खरी असेल, तर त्यामुळे अमेरिका व चीनमध्ये अण्वस्त्रस्पर्धा भडकू शकते. चीनने अण्वस्त्रस्पर्धा सुरू करु नये, यासाठी अमेरिका प्रयत्न करु शकते, पण ते यशस्वी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे चीनकडे असलेल्या हायपरसोनिक आण्विक क्षेपणास्त्राला निष्प्रभ करता येईल, अशा यंत्रणेसाठी अमेरिकेला मोठी गुंतवणूक करणे भाग पडेल’, असे ग्रॅहम यांनी बजावले. या मुद्यावर अमेरिकेचा संरक्षण विभाग व गुप्तचर यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची संसदेत ‘क्लासिफाईड मीटिंग’ घेणे आवश्यक आहे, अशी मागणीही रिपब्लिकन सिनेटरनी केली.

गेल्या आठवड्यात, ब्रिटनच्या ‘फायनान्शिअल टाईम्स’ने चीनच्या चाचणीचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यात सदर चाचणी ऑगस्ट महिन्यात पार पडल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता यासंदर्भातील नवी बातमी प्रसिद्ध झाली असून त्यात चीनने दोन हायपरसोनिक आण्विक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. पहिली चाचणी जुलै व दुसरी चाचणी ऑगस्ट महिन्यात घेण्यात आली, असे ‘फायनान्शिअल टाईम्स’ने प्रसिद्ध केले आहे. पहिली चाचणी २७ जुलैला घेण्यात आली असून, त्यात ‘हायपरसोनिक ग्लाईड व्हेईकल’चा वापर करण्यात आल्याचे नमूद केले आहे.चीनच्या ‘हायपरसोनिक मिसाईल टेस्ट’मुळे अण्वस्त्रस्पर्धा भडकेल - अमेरिकी सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांचा इशारा

दुसरी चाचणी १३ ऑगस्टला घेण्यात आली. या दोन्ही चाचण्यांमध्ये चिनी क्षेपणास्त्राने पृथ्वीच्या भ्रमणकक्षेतून (लो ऑर्बिट) प्रवास केल्याचेही समोर आले आहे. दोन्ही चाचण्या अमेरिकी यंत्रणांना सुगावा लागू न देता झाल्याचे समोर येत आहे. त्याचवेळी चाचणींदरम्यान चिनी क्षेपणास्त्रांनी दाखविलेली क्षमता अमेरिकी गुप्तचर यंत्रणांना चकित करणारी ठरल्याचा दावाही वृत्तपत्राने केला आहे. अमेरिकी संशोधकांच्या दाव्यानुसार, चीनची चाचणी अमेरिकेकडे असलेल्या हायपरसोनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानापेक्षा प्रगत आहे. त्यामुळे अमेरिकी यंत्रणांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचेही सांगण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या चाचणीबाबत काळजी व्यक्त केल्याची माहिती परराष्ट्र विभागाकडून देण्यात आली.

मात्र चीनने हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचे दावे नाकारले आहेत. चीनच्या परराष्ट्र विभागाने १६ जुलैला ‘स्पेस प्लेन’ची चाचणी घेतल्याची माहिती दिली आहे. इतर कोणतीही चाचणी घेतली नसल्याचे चीनने सांगितले. त्यामुळे या चाचण्यांबद्दलचे गूढ अधिकच वाढल्याचे समोर येत आहे.

leave a reply