‘बिग टेक’च्या दडपशाहीला आव्हान देण्याचा दावा करून ट्रम्प यांच्याकडून नव्या सोशल मीडिया नेटवर्कची घोषणा

वॉशिंग्टन – ‘बिग टेक’ कंपन्यांच्या दडपशाहीला आव्हान देण्यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या सोशल मीडिया नेटवर्कची घोषणा केली आहे. हे नेटवर्क पुढील वर्षापासून सक्रिय होणार असून सध्या सिलिकॉन व्हॅलीत कार्यरत असलेल्या उदारमतवादी ‘मीडिया कन्सोर्टियम’ला प्रतिस्पर्धी म्हणून आक्रमक भूमिका पार पाडेल, अशी ग्वाही ट्रम्प यांनी दिली. फेसबुक व ट्विटर या दोन्ही आघाडीच्या सोशल मीडिया नेटवर्क्सनी ट्रम्प यांच्यावर बंदी घातली आहे. या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प यांनी, नवी कंपनी व नेटवर्क सुरू केल्याचे सांगण्यात येते.

‘बिग टेक’च्या दडपशाहीला आव्हान देण्याचा दावा करून ट्रम्प यांच्याकडून नव्या सोशल मीडिया नेटवर्कची घोषणाबुधवारी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी, ‘ट्रम्प मीडिया ऍण्ड टेक्नॉलॉजी ग्रुप’, या नव्या कंपनीची स्थापना करीत असल्याची घोषणा केली. ‘सिलिकॉन व्हॅलीतील ‘बिग टेक’ कंपन्या त्यांची अमर्याद सत्ता वापरून अमेरिकेतील विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याविरोधात ठामपणे उभे ठाकून संघर्ष करणे हे नव्या कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट असेल’, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले. त्यासाठी ‘ट्रुथ सोशल’ नावाचे स्वतंत्र सोशल मीडिया नेटवर्क उभारण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

‘ट्रुथ सोशल व नव्या कंपनीची निर्मिती बिग टेकच्या दडपशाहीविरोधात लढण्यासाठी करण्यात आली आहे. ट्विटरवर तालिबान आहे, पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर बंदी टाकण्यात आली आहे. ही बाब अस्वीकारार्ह आहे. मी लवकरच पहिले ट्रुथ नव्या सोशल मीडियावरून प्रसिद्ध करीन. बिग टेकविरोधातील लढा लवकरच सुरू होईल’, अशा शब्दात माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नव्या उपक्रमाची माहिती दिली. ‘बिग टेक’च्या दडपशाहीला आव्हान देण्याचा दावा करून ट्रम्प यांच्याकडून नव्या सोशल मीडिया नेटवर्कची घोषणा‘ट्रम्प मीडिया ऍण्ड टेक्नॉलॉजी ग्रुप’कडून ‘व्हिडिओ ऑन डिमांड’ सेवाही पुरविण्यात येणार असून त्यावर मनोरंजनाचे कार्यक्रम, बातम्या तसेच पॉडकास्ट प्रदर्शित करण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.

ट्रम्प यांच्या कारकिर्दीत व त्यानंतर परंपरावादी रिपब्लिकन पक्ष आणि ‘बिग टेक’ यांच्यात मोठा संघर्ष सुरू झाल्याचे दिसून आले आहे. फेसबुक व ट्विटर या दोन्ही आघाडीच्या सोशल मीडिया नेटवर्क्सनी माजी राष्ट्राध्यक्षांसह त्यांचे समर्थन करणार्‍या अनेक अकाऊंट्सवर बंदी घातली होती. त्याला आव्हान देण्यासाठी ‘पार्लर’, ‘गॅब’ यासारखी ऍप्स सुरू करण्यात आली होती. ट्रम्प यांनी स्वतः एक ब्लॉगही सुरू केला होता. मात्र नवी कंपनी व सोशल मीडिया ऍप हा निर्णायक प्रयत्न असल्याचे संकेत ट्रम्प यांच्या निकटवर्तियांकडून देण्यात आले आहेत.

leave a reply