तैवानचा ताबा घेण्याचा चीनचा हेतू उघड आहे

- अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडचे माजी प्रमुख 

वॉशिंग्टन – चीन तैवानमध्ये लष्कर घुसवून मोठे युद्ध छेडणार नाही. पण तैवानचा ताबा घेण्याचा चीनचा हेतू अगदी उघड आहे. तैवानला असलेल्या या धोक्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक अमेरिकेने करू नये, असे आवाहन अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडचे माजी प्रमुख ॲडमिरल हॅरी हॅरिस यांनी केले. अमेरिकन लोकप्रतिनिधीगृहाच्या ‘आर्म्ड्‌‍ सर्व्हिसेस कमिटी’समोर बोलताना ॲडमिरल हॅरिस यांनी तैवानच्या सुरक्षेकडे गंभीरपणे पाहण्याचा सल्ला दिला.

चीनची कम्युनिस्ट राजवट व लष्करी अधिकारी उघडपणे तैवानचा ताबा घेण्याची धमकी देत आहेत. तैवानमधील लोकशाही समर्थक राजवट उलथण्याचे संकेत चीनचे अधिकारी देत आहेत. तर अमेरिकेचे नेते, लष्करी अधिकारी आणि विश्लेषक तैवानला चीनपासून असणाऱ्या या धोक्याकडे लक्ष वेधून बायडेन प्रशासनाला तैवानच्या सुरक्षेसाठी आवाहन करीत आहेत.

leave a reply