आर्मेनिया-अझरबैझान सीमेवर पुन्हा संघर्ष

- माजी सोव्हिएत देशांमधील अमेरिकेच्या हस्तक्षेपावर रशियाचा आक्षेप

येरेवन/मॉस्को – नागोर्नो-काराबाख या विवादास्पद क्षेत्रावरुन आर्मेनिया व अझरबैझान यांच्यात पुन्हा संघर्ष पेटला आहे. यामध्ये एक जवान जखमी झाल्याचा दावा केला जातो. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी या देशांच्या नेत्यांबरोबर केलेल्या चर्चेनंतर हा संघर्ष पेटल्याचे रशियन माध्यमे लक्षात आणून देत आहेत. आर्मेनिया-अझरबैझानबरोबरची अमेरिकेची चर्चा म्हणजे मध्य आशियातील आपल्या हितसंबंधांवरील राजनैतिक हल्ला असल्याची टीका रशियाने केली आहे.

आर्मेनिया-अझरबैझान सीमेवर पुन्हा संघर्ष - माजी सोव्हिएत देशांमधील अमेरिकेच्या हस्तक्षेपावर रशियाचा आक्षेपगेल्या महिन्यात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी म्युनिक येथील सुरक्षा परिषदेत अझरबैझान व आर्मेनियाच्या राष्ट्रप्रमुखांची भेट घेतली होती. गेल्या कित्येक वर्षांपासून आर्मेनिया आणि अझरबैझानमधला नागोर्नो-काराबाखचा वाद सोडविण्यासाठी अमेरिका मध्यस्थीसाठी तयार असल्याचे ब्लिंकन यांनी म्हटले होते. तर सोमवारी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाश्नियान तसेच अझरबैझानचे राष्ट्राध्यक्ष इलहान अलीयेव यांच्याशी फोनवरुन चर्चा केली.

आर्मेनिया व अझरबैझान हे दोन्ही सोव्हिएत रशियाचा भाग होते. 1990च्या दशकात सोव्हिएत रशियाचे विभाजन झाल्यानंतर आर्मेनिया व अझरबैझान स्वतंत्र झाले. तरी देखील हे दोन्ही इंधनसंपन्न देश रशियाच्या प्रभावक्षेत्रात येतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून अमेरिका व युरोपिय देशांनी या दोन्ही देशांना आपल्या गटात सामील करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आर्मेनिया-अझरबैझान सीमेवर पुन्हा संघर्ष - माजी सोव्हिएत देशांमधील अमेरिकेच्या हस्तक्षेपावर रशियाचा आक्षेपअझरबैझानमधून इंधन पाईपलाईन युरोपपर्यंत आणण्यासाठी चर्चा सुरू आहेत. तर या दोन्ही सोव्हिएत देशांना नाटोशी जोडण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जातो.

यामुळे संतापलेल्या रशियाने अमेरिकेवर जोरदार ताशेरे ओढले. नागोर्नो-काराबाखच्या मुद्यावर रशियाने आर्मेनिया व अझरबैझानमध्ये संघर्षबंदी घडविली आहे. या दोन्ही देशांसह रशियाने त्रिपक्षीय चर्चा सुरू केली आहे. तरी देखील पाश्चिमात्य देश इथे करीतअसलेला हस्तक्षेप म्हणजे रशियावरील राजनैतिक हल्ला ठरतो, असा आरोप रशियन परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी केला. पाश्चिमात्य देश यासंदर्भातील रशियाचे प्रयत्न दुर्लक्षित करून स्वत:चे विचार लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचा ठपका लॅव्हरोव्ह यांनी ठेवला.

हिंदी

 

leave a reply