देशाच्या काही भागात कोरोनाचे सामुदायिक संक्रमण

- केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन

नवी दिल्ली – कोरोनाच्या संक्रमणाच्या बाबतीत भारत ‘कम्युनिटी ट्रान्समिशन’च्या (सामुदायिक संक्रमण) टप्प्यात पोहोचाला आहे. मात्र हे सामुदायिक संक्रमण देशाच्या काही जिल्ह्ये आणि राज्यांपुरतेच मर्यादित असल्याचे, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे. पहिल्यांदाच केंद्र सरकारकडून देशात सामुदायिक संक्रमणाचा उल्लेख केला आहे. त्याचवेळी देशात कोरोनाची साथ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अटोक्यात आलेली असेल, असा अंदाज सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या समितीने व्यक्त केल्याचे वृत्त आहे.

सामुदायिक संक्रमण

देशातील कोरोनाच्या रुग्णाची संख्या ७५ लाख ५० हजारांजवळ पोहोचली आहे. तसेच या साथीत दगावलेल्यांची संख्या एक लाख १४ हजारांच्या पुढे गेली आहे. तसेच ६६ लाख ५४ हजार रुग्ण बरे झाले आहेत. सप्टेंबरच्या तुलनेत देशात दरदिवशी सापडणाऱ्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या घेतल्याचे दिलासादायक चित्र आहे. मात्र महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये चार ते दहा हजार रुग्ण आढळत आहेत. रविवारी महाराष्ट्रात आणि केरळात नऊ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली.

सामुदायिक संक्रमणया पार्श्वभूमीवर देशात कोरोनाची साथ सामुदायिक संक्रमणाच्या स्तरावर पोहोचल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालसह काही राज्यात सामुदायिक संक्रमणाची नोंद आहे. पण सर्वच ठिकाणी सामुदायिक संक्रमण झालेले नाही. काही राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये सामुदायिक संक्रमण दिसून आलेले आहे. विशेषतः जास्त दाटीवाटीच्या भागांमध्ये सामुदायिक संक्रमण सिमीत आहे. तसेच उत्सव काळात सर्वानी अधिक दक्षता बाळगावी. सावधगिरी बाळगळी नाही, तर संक्रमणाचा धोका आहे, असा इशाराही हर्ष वर्धन यांनी दिला.

त्याचवेळी के. विजयराघवन यांच्या अध्यक्षतेखालील वौज्ञानिक समितीने फेब्रुवारी महिन्यापर्यंत साथ आटोक्यात आलेली असेल, असा अंदाज वर्तवला आहे. सध्या देशात ७५ लाख कोरोना नोंद झाली आहे. मात्र देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या १ कोटी ६ लाखांच्या आसपास राहील. त्यापुढे जाणार नाही, असा निष्कर्ष या समितीने काढल्याचे वृत्त आहे. तसेच देशात मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आला नसता तर २५ लाख जणांचे प्राण या साथीमुळे गेले असते, असाही या समितीचा दावा असल्याची बातमी आहे.

leave a reply